शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

अमरावती विभागात ५,९७८ स्मार्टकार्डधारकप्रवासी

By admin | Updated: May 14, 2014 00:12 IST

शाळा, महाविद्यालये सुरू होताच ये-जा करण्यासाठी एसटीची पास मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांना रांगेत लागावे लागते. मात्र एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांसाठीही स्मार्टकार्डची सुविधा उपलब्ध

जितेंद्र दखने - अमरावती

शाळा, महाविद्यालये सुरू होताच ये-जा करण्यासाठी एसटीची पास मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांना रांगेत लागावे लागते. मात्र एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांसाठीही स्मार्टकार्डची सुविधा उपलब्ध केल्याने त्यांची या सर्व त्रासातून सुटका होणार आहे.

मासिक, त्रैमासिक, पासधारक आणि आवडेल तेथे प्रवास करणार्‍यांनाही पासऐवजी स्मार्टकार्ड मिळणार आहेत. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला मिळालेले स्मार्टकार्ड तीन वर्ष वापरता येणार आहे. आतापर्यंत राज्य परिवहन महामंडळाने ५,९७८ स्मार्ट कार्डचे वाटप केले आहे.

महामंडळाच्या ८ आगारात सध्या इलेक्ट्रॉनिक तिकीट देण्याची व्यवस्था आहे. त्यासाठी मशीन उपलब्ध आहेत. या मशिनद्वारेच स्मार्टकार्ड सुविधेचा लाभ घेता येईल. प्रत्येक स्मार्टकार्डला एक विशिष्ट सांकेतिक क्रमांक देण्यात आला आहे. त्यामुळे पास फाटणे, फोटो नसणे आणि दर महिन्याला नवीन पास काढण्याची कसरत विद्यार्थ्यांना करावी लागणार नाही. यासोबतच अन्य एसटी प्रवाशांनाही स्मार्टकार्ड देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. नव्याने देण्यात आलेले एक आणि तीन महिन्याचे पास प्रवासी वापरु शकतात. वाहकालाही स्मार्टकार्ड वापरणे सोपे होणार आहे. त्यांच्याकडील मशिनमध्ये ते वापरण्याची व्यवस्था आहे. स्मार्टकार्ड पंचिंग करताच त्यातून ज्या ठिकाणी जायचे आहे त्या प्रवासाचे पैसे कमी होतील. आणि प्रवाशांना तिकीट देखील मिळेल. विद्यार्थी आपल्या गरजेनुसार कार्ड रिचार्ज करु शकतात. जेवढा प्रवास केला जाईल तेवढे कार्डवरील पैसे कमी होतील. ते संपल्यानंतर स्मार्टकार्ड रिचार्ज करता येईल. त्यासाठी पुन्हा नव्याने फॉर्म भरण्याची गरज नाही. ही प्रक्रिया गतिमान असल्यामुळे रांगेतही उभे राहण्याची गरज भासणार नाही. स्मार्टकार्ड आणि प्रक्रिया शुल्क म्हणून ३७ रुपये खर्च होणार आहे. प्रत्येकाच्या नावातील याद्यानुसार कार्डवर क्रमांक टाकण्यात येणार असून तीन ते सात दिवसांत कार्ड दिले जाईल. कायमस्वरुपी स्मार्टकार्डचा कालावधी ३ वर्षांचा असेल. अमरावती विभागात आतापर्यंत कमी कालावधीसाठी १ हजार ९९८ तर कायमस्वरुपी ३ हजार ९८0 स्मार्टकार्डचे वाटप करण्यात आले आहे.