शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

८ महिन्यांत ५८ खून

By admin | Updated: October 4, 2016 06:11 IST

गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे ‘क्राईम ग्राफ’चा मुद्दा चर्चेत आला आहे. मागील

दरोडे, अपहरण, फसवणुकीच्या प्रमाणात वाढ : एकूण गुन्ह्यांचे प्रमाण चार टक्क्यांनी घटले नागपूर : गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे ‘क्राईम ग्राफ’चा मुद्दा चर्चेत आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी सुरुवातीच्या आठ महिन्यांत एकूण गुन्ह्यांचे प्रमाण चार टक्क्यांनी कमी झाले असले तरी सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत वाढली आहे. २०१६ मध्ये आॅगस्ट महिन्यापर्यंत शहरात ५८ खून झाले आहेत. मागील वर्षी हीच संख्या ४७ इतकी होती. याशिवाय दरोडे, अपहरण, फसवणुकीच्या प्रमाणातदेखील मागील वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी २०१६ सालात शहरात घडलेल्या विविध गुन्ह्यांबाबत माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. जानेवारी ते आॅगस्ट या कालावधीत शहरात किती गुन्ह्यांची नोंद झाली, त्यात हत्येचे किती गुन्हे होते, मागील वर्षी या महिन्यांतील आकडेवारी किती होती, याबाबत त्यांनी प्रश्न विचारले होते. नागपूर पोलिसांच्या गुन्हेशाखेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जानेवारी २०१६ ते आॅगस्ट २०१६ या कालावधीत शहरात विविध प्रकारचे ६ हजार ३७९ गुन्हे नोंदविण्यात आले. यातील ४ हजार ४३ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. १७ दरोडे, ३२५ अपहरण २०१६ मधील १ जानेवारी ते ३१ आॅगस्ट या कालावधीत शहरात १७ दरोडे टाकण्यात आले. तर ३२५ अपहरणाच्या प्रकरणांची नोंद झाली. मागील वर्षीच्या तुलनेत अपहणांचे प्रमाण ३४ टक्क्यांनी वाढले आहे. दरोड्यांच्या एकूण प्रकरणांपैकी १४ मध्ये पोलिसांना आरोपींचा छडा लावण्यात यश आले. तर अपहरणांच्या प्रकरणांत हाच आकडा २८४ इतका आहे. फसवणुकीच्या घटनांचे प्रमाणदेखील वाढीस लागले असून ८ महिन्यांत २६४ प्रकरणांची नोंद झाली.