नागपूर : जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून तपासण्यात आलेल्या ९१२ पाण्याच्या नमुन्यांपैकी ५४ पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत.
प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत प्राथमिक आरोग्य केंद्राकडून येणाऱ्या पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते. ही तपासणी प्रत्येक महिन्यामध्ये केली जाते. त्यातून दूषित पाणी आढळलेल्या गावात जनजागृती केली जाते. तसेच संबंधित ग्रामपंचायतला ब्लिचिंग पावडर टाकणे, पाण्याच्या स्रोताजवळ स्वच्छता राखणे, गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करणे अशा उपाययोजना केल्या जातात. मात्र, ग्रामीण पातळीवरील कर्मचारी व पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे आजही नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. जानेवारी महिन्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातून ९१२ पाणी नमुने अनुजीव तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. त्यापैकी ५४ पाणी नमुने दूषित आढळून आले. उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दूषित पाण्यामुळे विविध प्रकारचे आजार बळावतात.
- तालुकानिहाय गावांमध्ये दूषित आढळलेले पाणी नमुने
तालुका तपासलेले पाणी नमुने दूषित
भिवापूर ५२ १
कळमेश्वर ६१ ३
पारशिवनी ६६ ०
उमरेड ७७ ६
कुही ८५ १
सावनेर ४७ ०
हिंगणा ७१ ८
काटोल ३५ ०
देवलापार ५१ ०
कामठी ७० २
रामटेक ८५ २०
नरखेड ५२ ६
नागपूर ५३ ०
मौदा ८८ ८
----------------------------------------------
एकूण ९१२ ५४