शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

५० हजारांत नोकरी, तीसुद्धा टपाल खात्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:13 IST

वसीम कुरैशी नागपूर : टपाल विभागात ५० हजार रुपयांत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीचा प्रकार बुधवारी उघडकीस ...

वसीम कुरैशी

नागपूर : टपाल विभागात ५० हजार रुपयांत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. यातील उमेदवारांकडून ५० हजार रुपये घेऊन त्यांना सर्व्हिस ऑपरेटर या पदाच्या नोकरीचे आदेशपत्रही देण्यात आले. ते घेऊन तिघे जण रुजू होण्यासाठी जीपीओ कार्यालयात गेले असता असे कोणतेही पद नसून त्यासाठी भरती प्रक्रियाच झाली नसल्याचे कळले, अन्‌ तेव्हा कुठे हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ११ वाजताच्या दरम्यान विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बागेमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ठकबाजांची टोळी तीन आलिशान वाहनांमधून तिथे पोहोचली. यातील दोन वाहनांवर मुंबईचे क्रमांक होते. ठकबाजांची टोळी तिथे पोहोचताच काही युवकांनी वाहनांमधून उतरणाऱ्या व्यक्तींना पदस्पर्श केला. तुमच्यामुळेच नोकरी लागली, त्यामुळे आम्ही आभारी आहोत, असे ते म्हणत होते. तिथे मुलाखतीसाठी आलेल्यांना हे दृश्य पाहून विश्वास अधिकच दृढ झाला.

मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजता आलेल्या एका फोन कॉलमुळे या प्रकाराची कल्पना आली होती. मुलाखतपत्र घेऊन तीन उमेदवार रुजू होण्यासाठी आलेल्यांकडून अद्यापही आयुक्त कार्यालयाच्या बागेमध्ये मुलाखती सुरू असल्याचे कळले. त्यामुळे खरे काय ते जाणून घेण्यासाठी जीपीओ कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आयुक्त कार्यालयाच्या बागेत पोहोचून संशयित ठकबाजांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी वाहनांसह काढता पाय घेतला. अधिकाऱ्यांनी फसवणूक झालेल्या उमेदवारांशीही चर्चा केली. मात्र त्यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यास नकार दिला.

सूत्रांच्या माहितीनुसार, आधी सिव्हिल लाइन्समधील एका खाजगी बॅंकेसमोर मुलाखती घेण्याचे ठरले होते. मात्र काही वेळानंतर जागा बदलण्यात आली. जीपीओ कार्यालयासमोर मुलाखती होतील, असे सांगण्यात आले. २० उमेदवारांच्या मुलाखती होणार होत्या. त्यातील एका गटाला सकाळी ११ वाजता, दुसऱ्या गटाला दुपारी २ वाजता आणि तिसऱ्या गटाला ४ वाजताची वेळ देण्यात आली होती.

...

बॉक्स

उच्चशिक्षित उमेदवारही घेऱ्यात

टपाल खात्यातील नोकरभरतीची जाहिरात अधिकृत वेबसाईटवर दिली जाते. वृत्तपत्रातही ती येते. मात्र अलीकडे भरती असल्यासंदर्भात कोणतीही अधिकृत जाहिरात प्रकाशित झालेली नव्हती. तरीही उच्चशिक्षित युवकही ठकबाजांच्या घेऱ्यामध्ये अडकले. जीपीओमध्ये मुलाखतीसाठी जाणाऱ्यांमध्ये अनेक उच्च शिक्षितही होते. या प्रकरणाच्या तक्रारीसाठी टपाल विभागातील अधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी पोलीस ठाणे गाठले. वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

...