शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

५० हजारावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 21:27 IST

बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब,क,ड), विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्गासाठी राखीव नोकºया मिळविल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्राचे दावे खारीज झालेल्या ५० हजारावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर पुन्हा एकदा गदा आली. अशा कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवण्याच्या शासन निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह सरकारच्या मनसुब्यांनाही जोरदार धक्का बसला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा अंतरिम निर्णय : जातीचे वैधता प्रमाणपत्र नसलेले अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब,क,ड), विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्गासाठी राखीव नोकऱ्या मिळविल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्राचे दावे खारीज झालेल्या ५० हजारावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर पुन्हा एकदा गदा आली. अशा कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवण्याच्या शासन निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह सरकारच्या मनसुब्यांनाही जोरदार धक्का बसला.संबंधित शासन निर्णयाविरुद्ध आॅर्गनायझेशन फॉर दि राईटस् आॅफ ट्रायबलने रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ६ जुलै २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने विविध याचिका निकाली काढताना बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब,क,ड), विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरी मिळविल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्राचे दावे अवैध ठरलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये संरक्षण दिले जाऊ शकत नाही असा निर्णय दिला. गैरप्रकार करून राखीव पदांवर नोकरी मिळविणे घटनाबाह्य व जात वैधता प्रमाणपत्र कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम ठेवले जाऊ शकत नाही. त्यांची सेवा समाप्त करण्यात यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. सर्वोच्च न्यायालयाने असाच दुसरा निर्णय १३ एप्रिल २०१८ रोजीदेखील दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयांची अंमलबजावणी कशाप्रकारे करायची यासंदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी व आवश्यक शिफारशी सुचविण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याकरिता राज्य सरकारने ५ जून २०१८ रोजी लेखी निर्णय जारी केला. समितीने तीन महिन्यात अहवाल सादर करावा व समितीच्या शिफारशींवर अंतिम निर्णय होतपर्यंत कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यात येऊ नये. त्यांच्या नोकऱ्यांची खुल्या प्रवर्गात गणना करण्यात यावी असे निर्णयात नमूद करण्यात आले. या निर्णयावर याचिकाकर्त्याचा आक्षेप आहे. हा निर्णय अवैध, एकतर्फी व जात प्रमाणपत्र वैधता कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणारा असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. हा निर्णय रद्द करण्यात यावा अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे.राज्य सरकारला मागितले उत्तरउच्च न्यायालयाने मुख्य सचिव, आदिवासी विकास सचिव, उच्च व तंत्र शिक्षण सचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सचिव, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्गीय कल्याण विभागाचे सचिव, समाज कल्याण सचिव, महसूल सचिव, क्रीडा व युवक कल्याण विभागाचे सचिव, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव यांच्यासह इतर प्रतिवादींना नोटीस बजावून याचिकाकर्त्याच्या तक्रारींवर ९ जुलैपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.अनुसूचित जमाती प्रवर्गात ८२ हजारावर कर्मचारीअनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळविणारे एकूण ८२ हजार ४४६ कर्मचारी सरकारी सेवेत आहेत. त्यापैकी ३९ हजार ५०६ कर्मचारी १५ जून १९९५ पूर्वीचे तर, ४२ हजार ९४० कर्मचारी त्यानंतरचे आहेत. यातील केवळ ५२ हजार ६९२ कर्मचाऱ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले आहे. २९ हजार ८०१ कर्मचाऱ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. ११ हजार ८१९ कर्मचाºयांचे जात वैधता प्रमाणपत्राचे दावे पडताळणी समितीकडे प्रलंबित आहेत तर, १२ हजार ८२४ कर्मचाऱ्यांनी पडताळणी समितीकडे दावेच सादर केलेले नाहीत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयEmployeeकर्मचारी