शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

५० हजारांवर धोकादायक वाहने रस्त्यावर

By admin | Updated: August 31, 2015 02:38 IST

जुनाट व कालबाह्य झालेल्या वाहनांना रंगरंगोटी करून ती वाहने वाहतुकीसाठी वापरात आणून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार नागपुरात सर्रास सुरू आहेत.

लोकमत विशेषयोग्यता प्रमाणपत्राशिवाय धावतात वाहने : जीवाशी खेळण्याचा सर्रास प्रकारसुमेध वाघमारे  नागपूरजुनाट व कालबाह्य झालेल्या वाहनांना रंगरंगोटी करून ती वाहने वाहतुकीसाठी वापरात आणून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार नागपुरात सर्रास सुरू आहेत. विशेष म्हणजे, शहरातील ट्रक, टँकर, कचरा उचलणारी वाहने, ट्रेलर, बस, आॅटोरिक्षा, सहासीटर आदी प्रकारच्या सुमारे ५० हजाराच्यावर वाहनांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) वार्षिक तपासणी (पासिंग) करून घेऊन योग्यता प्रमाणपत्र घेतले नसल्याची धक्कादायक माहिती आहे. चौकाचौकात उभे राहणाऱ्या वाहतूक पोलिसांकडून व आरटीओकडून कारवाई होत नसल्याने ही धोकादायक वाहने अपघाताला आमंत्रण देत आहे.गेल्या १० वर्षांत नागपूरची लोकसंख्या सुमारे ३५ टक्क्यांनी वाढली आहे. याच्या तुलनेत खासगी वाहनांच्या संख्येत ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खासगी वाहनांची वाढती संख्या हे वाहतूक कोंडीचे खरे कारण ठरत आहे. २०१२ मध्ये शहरात वाहनांची संख्या ११ लाख ५७ हजार ३४ होती, मागील वर्षापर्यंत ही संख्या पावणेतेरा लाखांपर्यंत पोहोचली आहे, तर आता १४ लाख ३८ हजारांवर गेली आहे. यामध्ये दुचाकी, चारचाकी या खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सार्वजनिक वाहतुकीचा परवाना घेऊन चालणाऱ्या ट्रक, टँकर, ट्रेलर, बस, टुरिस्ट टॅक्सी, आॅटोरिक्षा या वाहनांची संख्या १ लाख ५० हजार इतकी आहे. त्यापैकी सुमारे ५० हजार वाहनांनी पासिंगच केले नसल्याची बाब उजेडात आली आहे. यामुळे वाहनांचा ब्रेक फेल होणे, टायर फुटणे, अचानक इंजिनमधील बिघाड होऊन रस्त्याच्या मधोमध वाहन थांबणे, आदी प्रकारांमुळे अपघातांची व त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतुकीचा परवाना घेतलेल्या वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. सार्वजनिक वाहतुकीचा परवाना दिलेली वाहने दिवस-रात्र सर्वत्र फिरत असतात. त्यामुळे ही वाहने सुस्थितीत आहेत की नाही, याकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. पासिंग संपताच मिळते नोटीसपासिंग संपलेल्या वाहनांना आरटीओ कार्यालयाकडून नोटीस पाठविले जाते. त्यानंतरही कोणी पासिंग करवून घेत नसेल तर आॅटोला वर्षाला १० हजार रुपयांपर्यंतचा दंड तर इतर वाहनांसाठी १२ ते १५ हजार रुपयांपर्यंत दंड आहे. याशिवाय आरटीओच्या वायू पथकांकडून वेळोवेळी रस्त्यावर वाहनांची तपासणी करून वाहने तपासली जातात. -विजय चव्हाणउपप्रादेशिक परिवहन अधिकारी, शहर