शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदांपैकी ५० टक्के पदे भरणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2016 03:13 IST

मोटार वाहन विभाग हा राज्य शासनाला महसूल मिळवून देणारा महत्त्वपूर्ण विभाग आहे.

मुख्यमंत्री फडणवीस : मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटननागपूर : मोटार वाहन विभाग हा राज्य शासनाला महसूल मिळवून देणारा महत्त्वपूर्ण विभाग आहे. या विभागात रिक्त असलेल्या पदांपैकी ५० टक्के पदे भरण्याची सूचना या आधीच दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी, भत्ते वाढ करून देण्यासंदर्भात शासन सकारात्मक आहे. या विभागाने शासनाच्या महसुलात वाढ केल्यास त्याची ‘मेरिट केस’ बनवून मागण्या पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले. उत्तर अंबाझरी मार्गावरील महाराणा प्रताप सभागृहात मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेच्यावतीने आयोजित १३ व्या राज्यस्तरीय कर्मचारी संघटनेच्या अधिवेशनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस सुनील जोशी, राज्य परिवहन आयुक्त श्याम वर्धने, प्रादेशिक परिवहन अधिकारी (नागपूर ग्रामीण) शरद जिचकार, नगरसेवक परिणय फुके, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस अशोक थुल, मध्यवर्ती संघटना नागपूर विभागाचे अध्यक्ष चंद्रहास सुटे, मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष नारायण समर्थ, चिटणीस दशरथ घोडमारे, सुरेंद्र सरतापे, प्रशांत मांडवेकर व अनिल तांबडे उपस्थित होते. दरम्यान नारायण समर्थ यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. विभागाच्या ‘संवाद’ या स्मरणिकेचे विमोचनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक समर्थ यांनी केले. संचालन रेखा घिया (दंडिगे) यांनी केले. आभार प्रदीप लेहगावकर यांनी मानले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी) लोकशाहीचे मालक नव्हे सेवक व्हा मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना सेवा देणारा हा विभाग आहे. त्याचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरणही झाले पाहिजे. नागरिकांना उत्तम, कार्यक्षम सेवा हवी असते. यामुळे मालक नव्हे, सेवक व्हा असे आवाहन करीत विभागाची प्रतिमा सुधारण्यासाठी गतिमानता आवश्यक असल्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. नवीन तंत्रज्ञान व लोकांना जास्तीतजास्त आणि पारदर्शी सेवा देण्यासाठीही प्रयत्न केला जाणार असल्याचे ते म्हणाले. विभागातील रिक्त पदे भरल्यास शासनाला या विभागाकडून तीन ते चार हजार कोटी रुपयांचा महसूल मिळू शकतो, असे राज्य परिवहन आयुक्त श्याम वर्धने यांनी सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पदभरतीसंदर्भात शासन सकारात्मक विचार करत असल्याचेही ते म्हणाले.आपल्यापेक्षा बाजूच्या नाक्याचा महसूल मोठाशेजारच्या नाक्यांमधूनच आपल्या नाक्यावर वाहने येतात. असे असताना दोघांचा महसूल सारखाच असणे आवश्यक आहे, परंतु आपल्यापेक्षा बाजूच्या नाक्याचा महसूल मोठा आहे. ही गंभीर बाब आहे. तो वाढविण्याचा प्रयत्न करावा तसेच विविध नाक्यांसंदर्भात नागरिकांकडून तक्रारी येतात. त्या कशा कमी करता येतील, याचाही विचार करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. आश्वासनांचा पाठपुरावा करासुनील जोशी म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्त पदे, वेतनश्रेणी आणि भत्ते वाढ यावर आश्वासन दिले असले तरी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आपल्या सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहे. संघटनेला मजबूत करा, असे आवाहन करीत त्यांनी लिपीक म्हणून लागलेला कर्मचारी वर्ग दोनचे अधिकारी होऊनच सेवानिवृत्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी संघटना आपल्या सोबत राहील, अशीही ग्वाही दिली.