शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादच्या व्यापाऱ्याला ५० लाखांचा गंडा

By admin | Updated: October 10, 2015 03:07 IST

हैदराबादच्या एका व्यापाऱ्याला त्याच्या स्थानिक कर्मचाऱ्याने ५० लाखांचा गंडा घातला.

नागपूर : हैदराबादच्या एका व्यापाऱ्याला त्याच्या स्थानिक कर्मचाऱ्याने ५० लाखांचा गंडा घातला. इन्तरवाक कमरूद्दीन खान (वय ३४) असे आरोपीचे नाव आहे. तो बोरगांवमधील प्रशांत कॉलनीत राहतो.डब्ल्यूएलसी कॉलेज रोड, हैदराबाद येथील आदम अली (वय ३७) हे मोबाईल व्यापारी आहेत. त्यांचे अनेक ठिकाणी मोबाईल शॉप आणि सर्व्हिस सेंटर आहे. नागपुरातील एम्प्रेस मॉलमध्ये पहिल्या माळ्यावर त्यांचे ‘कॉमवेल मोबाईल’ सर्व्हिस सेंटर होते. येथे आरोपी इन्तरवाक खान ‘शॉप इन्चार्ज’ म्हणून कार्यरत होता. त्याने पदाचा दुरुपयोग करीत ग्राहकांच्या बनावट नोंदी करून त्यांच्या नावाने वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल्सचे सुटे भाग बोलवून घेतले. खोटे बिल तयार करून मोबाईलसह लाखोंचे सुटे भाग परस्पर विकले. त्याचप्रमाणे खराब झालेले साहित्य हैदराबादला पाठवून तो ट्रान्सपोर्टमध्ये खराब झाल्याचे सांगत अली यांच्या कंपनीला ५० लाख रुपयांचा गंडा घातला. १८ सप्टेंबरला ही बनवाबनवी उघड झाली. आदम अली यांनी आरोपी खानला विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे अली यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. गणेशपेठ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.(प्रतिनिधी)