शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

महावितरणतर्फे ४८ गुणवंत कामगारांचा गौरव

By admin | Updated: May 2, 2017 01:48 IST

वर्षभर ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता वीज ग्राहकांना २४ तास अखंडित वीज मिळावी याकरिता....

कामगार दिन : कार्यक्रमाला सहा वर्षांची परंपरा नागपूर : वर्षभर ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता वीज ग्राहकांना २४ तास अखंडित वीज मिळावी याकरिता अविरतपणे प्रयत्नशील असलेल्या ४८ वीज कामगारांचा महावितरणतर्फे सोमवारी कामगार दिनाचे औचित्य साधून गौरव करण्यात आला. महावितरणच्या विद्युत भवन मुख्यालयातील सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला महावितरणचे प्रादेशिक कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांच्यासह नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रफीक शेख व मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) किशोर मेश्राम उपस्थित होते. दरम्यान पाहुण्यांच्या हस्ते महावितरणमधील उत्कृष्ट काम करणाऱ्या यंत्रचालक व जनमित्र या तांत्रिक कामगारांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे, हा उपक्रम मागील सहा वर्षांपासून सातत्याने राबविल्या जात आहे. त्यानुसार यावर्षी वर्धा एमआयडीसी येथे काम करीत असताना सुरक्षा साधनांचा योग्य वापर करीत आपल्या पाच सहकारी कर्मचाऱ्यांचे प्राण वाचविल्याबद्दल वर्धा येथील प्रधान तंत्रज्ञ ए.बी. कडू यांचा प्रसाद रेशमे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच नागपूर ग्रामीण मंडलातील श्रीकांत फटिंग (उमरेड), अजय मोरे ( उमिया), अनंत कांबळे (गोंडखैरी), माधव घंगारे (येनवा), मनिराम डहारे (मांढळ), ईश्वर वाकडे (बेसूर), मारोती डुकरे (उमरेड), आनंदराव जपूलकर (हुडकेश्वर), सीरसेन मानकर (कन्हान), चंद्रभान खेरे (मनसर), महेश ठाकूर (मोदी लेन, कामठी), नितीन सावरकर (मौदा), गणपत कर्णेवार (खापरखेडा), अशोक झोडे (गोंडखैरी), सुधाकर जुनघरे (सावनेर), तपस्वी लांबट (पारशिवनी), कुंचिलाल नवधिंगे (खापा), रामकृष्णन ठंगमुथ्थू (खापा), मनोज बावणे (लोहारी सावंगा), सुरेश इटनकर (सावरगाव), नामदेव व्यवहारे (कोंढाळी), प्रमोद ठाकरे (काटोल), श्रीकांत देशमुख (कोहळी) नागपूर शहर मंडलातील प्रकाश जामोडकर (बुटीबोरी), जितेंद्र चौधरी (काँग्रेसनगर), सतीश दिघे (खापरी), सचिन कथलकर (मोहगाव), भास्कर चांदेकर (हिंगणा एमआयडीसी), साहेबराव गीते (हिंगणा), प्रेमलाल गुप्ता (रिजंट), रमेश मानकर (गोकुळपेठ) व अमोल रहाटे (त्रिमूर्तीनगर) यांचा समावेश होता. या सोबतच वर्धा मंडलातील रोशन देशमुख (कारंजा), हेमंत खोटे (भिडी), दिलीप मेशरे (कानगाव), शैलेश चरडे (आर्वी), अरविंद कदम (आष्टी), अरुण घाटे (रोहना), विजयकुमार सोंडवले (पिंपळखुटा), अशोक पाटणकर (कारंजा), नितीन सांगोळे (वर्धा), देवीदास उईके (सेलू), प्रशांत हिरपूरकर (वर्धा), राकेश ठाकरे (आंजी), महादेव सातपुते (देवळी), बंडू वाकडे (हिंगणघाट), संजय गायकवाड (कानगाव) व शामराव मून (गिरड) या तांत्रिक कर्मचाऱ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला अधीक्षक अभियंते उमेश शहारे, बंडू वासनिक, सम्राट वाघमारे, राजेंद्र पवार, मनीष वाठ, राकेश जनबंधू, स्वप्निल गोतमारे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अनिल बऱ्हाटे, कार्यकारी अभियंते सुहास मेत्रे, कुंदन भिसे, सोमन्ना कोळी, प्रफुल्ल लांडे, नीरज वैरागडे व संजय विटणकर यांचेसह अन्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मधुसूदन मराठे यांनी केले, तर सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)