शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गुन्ह्यांत बळी पडलेल्यांसाठी ४८ लाख मंजूर

By admin | Updated: July 7, 2016 03:00 IST

महाराष्ट्रात गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या व्यक्तींकरिता नुकसान भरपाई योजना’ याअंतर्गत शासनाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणला..

शासनाचा निर्णय : राज्य विधी सेवा प्राधिकरणाला मिळणार निधीराकेश घानोडे नागपूर ‘महाराष्ट्रात गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या व्यक्तींकरिता नुकसान भरपाई योजना’ याअंतर्गत शासनाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणला ४८ लाख रुपये मंजूर केले आहेत. यासंदर्भात गृह विभागाने अधिसूचना जारी केली आहे.२०१६-१७ वर्षाच्या अर्थसंकल्पात योजनेकरिता ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. योजनेंतर्गत राज्य विधी सेवा प्राधिकरणने शासनाकडे ५० लाख रुपयांची मागणी केली होती. परंतु, शासनाने ४८ लाख रुपये मंजूर केले असून उर्वरित निधी आवश्यकतेनुसार मागणीपत्र सादर झाल्यानंतर वितरित करण्यात येणार आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ३५७-क अनुसार गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी शासनाची आहे. यामुळे राज्य शासनाने केंद्र शासनाच्या सहकार्याने अशा व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत जीवित हानीसाठी २ लाख, अ‍ॅसिड हल्ला झाल्यास ३ लाख तर, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये भरपाई देण्यात येते. याशिवाय अंत्यसंस्कारासाठी २००० व वैद्यकीय उपचारासाठी कमाल १५ हजार रुपये खर्च देण्याची तरतूद योजनेत करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य विधी सेवा प्राधिकरणची आहे. भरपाई मिळवण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडे अर्ज सादर करावा लागतो. जिल्हा प्राधिकरणने नुकसान भरपाई नाकारल्यास याविरुद्ध ९० दिवसांमध्ये राज्य विधी सेवा प्राधिकरणकडे अपील करता येते. केंद्र शासन, राज्य शासन, मंडळे, महामंडळे व सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी आणि आयकरदाते यांना वगळून इतर सर्वजण योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र आहेत.