शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

४७ एकरातील गहू खाक

By admin | Updated: March 29, 2017 02:53 IST

शेतकऱ्याने त्याच्या शेतातील पालापाचोळा व कचरा जाळला. मात्र, वाढते तापमान व जोरात वाहणारी हवा यामुळे ही

१५० एकरात आग पसरली : खोपडी शिवारातील घटना तारसा : शेतकऱ्याने त्याच्या शेतातील पालापाचोळा व कचरा जाळला. मात्र, वाढते तापमान व जोरात वाहणारी हवा यामुळे ही आग परिसरातील शेतात पसरली. आटोकाट प्रयत्न करूनही ही आग नियंत्रणात न आल्याने अल्पावधीत या आगीने १५० एकर शेतीचा परिसर कवेत घेतला. त्यामुळे ४६.५ एकरातील कापणीला आलेले गव्हाचे उभे पीक राख झाले असून, उर्वरित १०३.५ एकरातील तणस, जनावरांचा चारा आणि पालापाचोळा जळाला. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांच्या मदतीने साडेचार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली. ही घटना मौदा तालुक्यातील खोपडी शिवारात मंगळवारी (दि. २८) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. सध्या गव्हाचे पीक कापणीला आले असून, काहींनी शेतातील गव्हाच्या पिकाची कापणीही केली आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी शेतीच्या खरीपपूर्व मशागतीला सुरुवात केली आहे. शेताची साफसफाई करण्याच्या उद्देशाने खोपडी शिवारातील एका शेतकऱ्याने मंगळवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास त्याच्या शेतात पालापाचोळा जाळला. जोरात वाहणारी हवा आणि वाढलेले तापमान यामुळे ही आग त्याच्याच शेतातील कापणी केलेल्या गव्हाचे खुंटापर्यंत पसरली. पुढे ही आग पसरतच गेली. आग वेळीच नियंत्रणात न आल्याने साईबाबा कोरकंचू (५०, रा. हनुमाननगर) ३.५ एकर, कशी इगडपुगट्टी (४१, रा. खेडी) यांच्या ६ एकर, प्रभाकर वासनिक (३५, रा. खेडी) यांच्या २ एकर, सुभाष वासनिक (३६, रा. खेडी) यांच्या ३.५ एकर, मनोज कडू ( ३०, रा. खेडी) यांच्या १२ एकर, प्रभाकर मेश्राम ( ४१, रा. खेडी) यांच्या ३.५ एकर, प्रदीप वासनिक (३०, रा. खेडी) यांच्या ३ एकर, अशोक वासनिक (४०, रा. खेडी) यांच्या २ एकर, जयदेव गजभिये (५१, रा. खेडी) यांच्या ४ एकर, रामकृष्ण नादेला (४१, रा. खेडी) यांच्या २ एकर आणि जयदेव गजभिये (४५, रा. नागपूर) यांच्या ५ एकर अशा एकूण ४६.५ एकरातील कापणीला आलेले गव्हाचे उभे पीक राख झाले. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांच्या तोंडचा घास ऐनवेळी हिरावल्या गेला आहे. हाती आलेले पीक गेल्याचे दु:ख शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. (वार्ताहर)