लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शुक्रवारी तीन विमानातून ४५९ यात्रेकरूं हजकरिता रवाना झाले. त्यात सहा महिन्याचा मुलगा व दोन वर्षांची मुलगी आकर्षणाचे केंद्र होते.शुक्रवारी हज हाऊस नागपूरमध्ये आजमिन-ए-हजला शुभेच्छा देण्याचा क्रम निरंतर सुरू होता. महापौर नंदा जिचकार यांनी हज यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या आणि सीटीसीचे अध्यक्ष हाजी अब्दुल कदीर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन महापौरांचा सत्कार केला. त्यानंतर आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, माजी खासदार गेव्ह आवारी, अशोक धवड, कृष्णकुमार पांडे, मनपा विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, यशवंत बाजीराव, लाला कुरेशी, गुलाम साबरी, छत्तीसगड हज कमिटीचे अध्यक्ष सैफुद्दीन यांनीही यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या.
तीन विमानातून ४५९ यात्रेकरू हजसाठी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 22:26 IST
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शुक्रवारी तीन विमानातून ४५९ यात्रेकरूं हजकरिता रवाना झाले. त्यात सहा महिन्याचा मुलगा व दोन वर्षांची मुलगी आकर्षणाचे केंद्र होते.
तीन विमानातून ४५९ यात्रेकरू हजसाठी रवाना
ठळक मुद्देशुक्रवारी विशेष विमाने : सहा महिन्याचा मुलगा आकर्षण