शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

होम आयसोलेशनचे ४,४६८ रुग्ण कुणाच्या भरवशावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:26 IST

नागपूर : कोरोनाची लक्षणे नसलेल्या किंवा अतिसौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना कोविड केअर सेंटर (सीसीसी) किंवा घरी स्वतंत्र सोय असल्यास ...

नागपूर : कोरोनाची लक्षणे नसलेल्या किंवा अतिसौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना कोविड केअर सेंटर (सीसीसी) किंवा घरी स्वतंत्र सोय असल्यास गृह विलगीकरण म्हणजे ‘होम आयसोलेशन’ करण्याचे निर्देश आहेत. परंतु सोय नसतानाही बहुसंख्य रुग्ण होम आयसोलेशनचा पर्याय निवडत आहेत. यातच कोविडबाबत आता बेफिकिरी वाढल्याने काही होम आयसोलेशनचे रुग्ण नियमांकडे विशेष लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. आरोग्य यंत्रणाही या रुग्णांप्रति गंभीर नसल्याचे चित्र आहे. यामुळे सद्यस्थितीत असलेले ४,४६८ रुग्ण नेमके कुणाच्या भरवशावर आहेत, हा प्रश्न आहे. परंतु प्रशासनाने आमचे लक्ष असल्याचा दावा केला आहे.

कोरोनाचे निदान झालेल्या रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या लक्षणानुसार वर्गीकृत केले जाते. लक्षणे नसलेले, सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र लक्षणानुसार रुग्णांना कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे दाखल केले जाते. परंतु दरम्यानच्या काळात अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांंना जर त्यांच्या घरामध्ये योग्य प्रकारे सुविधा उपलब्ध असेल तर त्यांच्या संमतीनुसार होम आयसोलेशन केले जाते. सध्या याचे प्रमाण वाढले आहे. नागपूर जिल्ह्यात ५,५६२ रुग्ण पॉझिटिव्ह असून, केवळ १५०२ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. उर्वरीत रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत.

-होम आयसोलेशनचे हे नियम पाळतात कोण!

होम आयसोलेशनचा रुग्णाला हवेशीर बंद खोलीत राहावे लागते. शक्यतो स्वतंत्र शौचालय असावे लागते. घरात फिरण्यावर बंधने असतात. घराबाहेर पडण्यावर प्रतिबंध असते. सर्जिकल मास्क वापरणे व दर सहा ते आठ तासाने बदलावे लागते. मास्कचे विघटन करण्यासाठी बीच सोल्यूशन (५ टक्के) अथवा सोडियम हयपोक्लोराईट (५ टक्के) वापरून मास्क डिसईनफेक्ट करावे लागते. घरी दिवस-रात्र काळजी घेणारी व्यक्ती असावी लागते. मोबाईलवरील आरोग्य सेतू अ‍ॅपवर अ‍ॅक्टिव्ह असावे लागते. या सर्व सोयी असल्यावरच व तसे रुग्णाने प्रतिज्ञापत्र लिहून दिल्यावरच रुग्णाला होम आयसोलेशन केले जाते. परंतु रुग्ण हे सर्व नियम पाळतात का, हा प्रश्न आहे.

- ना तपासणी, ना औषधी

आरोग्य यंत्रणेकडून होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांची ना तपासणी केली जाते, ना औषधी दिली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यांच्यानुसार पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर दोन दिवसात यंत्रणेचे कर्मचारी घरी येतात. केवळ कुटुंबाची माहिती घेऊन निघून जातात. विशेष म्हणजे, साधा ताप किंवा शरीरातील ऑक्सिजनची पातळीही मोजत नाही. औषधी मागूनही मिळत नाही.

जिल्ह्यातील एकूण रुग्ण-१,१६,९११

सध्या उपचार घेणारे रुग्ण-५,५६२

होम आयसोलेशनमधील रुग्ण-४,४६८

-रुग्णांचा पाठपुरावा व औषधोपचार दिला जातो

होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांचा आरोग्य यंत्रणेकडून पाठपुरावा केला जात आहे. सोबतच आवश्यकतेनुसार औषधोपचार दिला जात आहे. कुणा रुग्णाला काही समस्या असतील तर त्यांनी तक्रार करावी. त्याची गंभीर दखल घेण्यात येईल.

-डॉ. दीपक थेटे

प्रभारी, जिल्हा शल्यचिकित्सक