शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

४४ दिवसात पेट्रोलचे दर ९.१४ रुपयांनी घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 10:23 IST

महागाईने त्रस्त नागपूरकरांसाठी एक आनंदाची बाब म्हणजे गेल्या ४४ दिवसात पेट्रोलचे दर प्रति लिटर ९.१४ रुपयांनी खाली घसरले आहे.

ठळक मुद्देडिझेलचे दरही ५.१७ रुपयांनी खाली आले

आनंद शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महागाईने त्रस्त नागपूरकरांसाठी एक आनंदाची बाब म्हणजे गेल्या ४४ दिवसात पेट्रोलचे दर प्रति लिटर ९.१४ रुपयांनी खाली घसरले आहे. डिझेलचे दरही ५.१७ रुपयांनी घसरले आहे. गेल्या ४ आॅक्टोबर २०१८ रोजी पेट्रोल ९१.९१ रुपये प्रति लिटरप्रमाणे विकले गेले. आता १८ नोव्हेंबर रोजी घसरून ८२.७७ रुपयावर आले आहे. हीच स्थिती डिझेलबाबतही होती. ४ आॅक्टोबर रोजी डिझेल ८०.७१ रुपये प्रति लिटर विकले गेले. १८ नोव्हेंबर रोजी त्याचे दर ७५.५४ रुपये प्रति लिटर इतके होते. अखेर पेट्रोल-डिझेलच्या दरात कमतरता आली कशी? तर पेट्रोलियम क्षेत्रातील तज्ज्ञानुसार आंतराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. पूर्वी ८६ डॉलर प्रति बॅरेलच्या दरानुसार विकणारे कच्चे तेल आता ६८ रुपये प्रति डॉलरवर आले आहेत. जाणकार या घटनाक्रमामागे अमेरिकेचा हात असल्याचे सांगत आहेत. त्यांच्यानुसार अमेरिकेने आठ देशांवर इराणमधून कच्चे तेल घेण्यास बंदी घातली आहे. या देशांमध्ये प्रमुख आयातक भारत आणि चीनचा सुद्धा समावेश होता. यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर प्रचंड वाढले होते. नागपूरमध्ये पेट्रोलचे दर ९० रुपयाच्या वर गेले होते. आता अमेरिकेने आपल्या कच्च्या तेलाचा पुरवठा आंतरराष्ट्रीय बाजारात वाढवला आहे तसेच इराणमधून तेल घेण्यास बंदी घातलेल्या आठ देशांना काही प्रमाणात दिलासा दिल्यामुळे आता दिवसेंदिवस कच्चा तेलाच्या किमती घसरत आहेत. परिणामी नागपूरमध्ये पेट्रोल गेल्या ४४ दिवसात ९.१४ रुपये आणि डिझेल ५.१७ रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले. यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

६ डिसेंबरनंतर पुन्हा वाढणार किमतीपेट्रोलियम क्षेत्रातील तज्ज्ञानुसार पेट्रोलियम उत्पादक देशांची संघटना ओपेकची ६ डिसेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत तेल उत्पादन कमी करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. असे झाले तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ६ डिसेंबरनंतर पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा वाढू शकतात.

डॉलरच्या तुलनेत रुपया थोडा सुधारलाडॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यातही थोडी सुधारणा झाल्यानेही पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्यास मदत मिळाली असल्याचे सांगितले जाते. पूर्वी १ डॉलरसाठी ७४ रुपये द्यावे लागत होते. ते आता ७२ रुपयाच्या आसपास द्यावे लागत आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोल