शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

घड्याळ चोरीचा ४३ वर्षे जुना खटला निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 11:33 IST

राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये रविवारी घड्याळ चोरीचा ४३ वर्षे जुना खटला फिर्यादी विजय साहू यांच्या सामंजस्यामुळे निकाली निघाला. साहू यांनी या प्रकरणातील तक्रार मागे घेतली.

ठळक मुद्देलोक न्यायालयएकूण २ हजार ७२५ प्रलंबित प्रकरणे संपली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये रविवारी घड्याळ चोरीचा ४३ वर्षे जुना खटला फिर्यादी विजय साहू यांच्या सामंजस्यामुळे निकाली निघाला. साहू यांनी या प्रकरणातील तक्रार मागे घेतली.साहू हे एम्प्लॉयमेंट कार्ड काढण्यासाठी संबंधित कार्यालयात गेले असताना रमेश नावाच्या आरोपीने त्यांच्याशी संपर्क साधला. आरोपीने तो साहू यांच्या वडिलांचा साळा असल्याची खोटी माहिती दिली. दरम्यान, आरोपीने साहू यांची घड्याळ चोरली. याचा खटला प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी बी. डी. तारे यांच्या न्यायालयात प्रलंबित होता. हा खटला तडजोडीसाठी न्याय दंडाधिकारी शहजाद परवेझ यांच्या पॅनलसमक्ष ठेवण्यात आला होता. त्यानंतर साहू यांनी फिर्याद मागे घेऊन खटला संपवला. राष्ट्रीय लोक न्यायालयात या प्रकरणासह जिल्ह्यातील एकूण २ हजार ७२५ प्रकरणे सामंजस्याने संपविण्यात आली. त्यात १ हजार २१८ दिवाणी, फौजदारी व भूसंपादन वादाची प्रकरणे, ६०० मोटार वाहन कायदा प्रकरणे तर, ९०७ वादपूर्व प्रकरणांचा समावेश आहे.मोटार अपघात दावा न्यायाधिकरणचे न्यायाधीश एस. डी. दरणे यांच्या न्यायालयातील दोन प्रकरणे सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश वाय. बी. येणुरकर यांच्या पॅनलसमक्ष निकाली निघाली. एका प्रकरणात दावेदार कविता बजाज यांना टाटा एआयजी इन्शुरन्सकडून ३२ लाख तर, अनिता बडे यांना फ्युचर जनरल इन्शुरन्सकडून ३० लाख रुपये भरपाई मिळाली. धनादेश अनादराची ४२० प्रकरणे निकाली निघाली. एका प्रकरणात श्रीराम चिटस् कंपनीला विनोद खुराणा यांच्याकडून ९ लाख ५६ हजार ६२७ रुपये मिळाले. प्रकरणे ऐकण्यासाठी ६२ पॅनल्स तयार करण्यात आले होते. प्रत्येक पॅनलमध्ये एक न्यायाधीश, एक वकील व एक समाजसेवकाचा समावेश होता. उच्च न्यायालयातील प्रकरणे हाताळण्यासाठी न्या. रोहित देव, न्या. मनीष पितळे व सेवानिवृत्त न्या. एस. आर. डोणगावकर यांचे पॅनल्स तयार करण्यात आले होते. प्रभारी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा इंगळे, न्या. व्ही. बी. कुळकर्णी, न्या. धनराज काळे आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.वडिलाच्या मृत्यूनंतर मुलाचा पुढाकारफिर्यादी वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मुलाने तडजोडीसाठी पुढाकार घेतल्यामुळे ३८ वर्षे जुने विश्वासघाताचे प्रकरण निकाली निघाले. यातील पांडुरंग नावाच्या आरोपीने फिर्यादीकडून किरायाने घेतलेली सायकल परस्पर विकली होती. यासंदर्भातील खटला आतापर्यंत प्रलंबित होता.

टॅग्स :Courtन्यायालय