शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
4
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
5
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
7
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
8
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
9
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
10
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
11
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
12
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
13
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
14
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
15
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
16
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
17
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
18
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
19
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
20
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले

माहिती आयोगाकडे ४१ हजार अपील !

By admin | Updated: December 6, 2015 02:56 IST

राज्य माहिती आयोगाच्या राज्यभरातील विविध खंडपीठांकडे येणाऱ्या प्रकरणांची संख्या वाढीस लागली आहे.

५९ टक्के द्वितीय अपील निकाली : ६ हजार प्रकरणांत निर्णयांची अंमलबजावणीच नाहीनागपूर : राज्य माहिती आयोगाच्या राज्यभरातील विविध खंडपीठांकडे येणाऱ्या प्रकरणांची संख्या वाढीस लागली आहे. २०१४ या वर्षात माहिती आयोगाकडे द्वितीय अपिलाची ४१ हजारांहून अधिक अपिलं आली. मागील वर्षातील तसेच संबंधित वर्षातील मिळून ५९ टक्के प्रकरणेच निकाली काढण्यात आली व ४१ टक्के प्रकरणे प्रलंबित होती. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात राज्य माहिती आयोगाकडेच विचारणा केली होती. २०१४ या वर्षात आयोगाला किती द्वितीय अपिलं प्राप्त झाली व त्यातील किती प्रकरणांवर सुनावणी झाली. तसेच आयोगाच्या खंडपीठांनी दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबाबत किती तक्रारी प्राप्त झाल्या, या प्रश्नांचा समावेश होता.निर्णयाची अंमलबजावणीच नाहीनागपूर : माहिती आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील आठ माहिती आयुक्तांकडे जानेवारी ते डिसेंबर २०१४ या कालावधीत ४१ हजार ६४५ अपिलं आली. २०१३ अखेरीस प्रलंबित असलेली २९ हजार ३४४ अपिलं होती. म्हणजेच २०१४ साली विविध माहिती आयुक्तांना ७० हजार ९८९ प्रकरणांवर सुनावणी करायची होती. परंतु यापैकी ४२ हजार ३८४ म्हणजेच ५९ टक्के अपिलं निकाली काढण्यात आली, तर २८ हजार ६०५ अपिलं प्रलंबित होती.माहिती आयोगाच्या खंडपीठांतर्फे देण्यात येणाऱ्या निर्णयाची अनेकदा अंमलबजावणी होत नाही. यासंबंधात माहितीचा अधिकार २००५ मधील कलम १८ नुसार राज्य माहिती आयोगाकडे तक्रार प्राप्त करता येते. २०१४ या वर्षात अशाप्रकारच्या ५,७७० तक्रारी प्राप्त झाल्या. २०१३ च्या प्रलंबित तक्रारींची संख्या ३,३३८ इतकी होती. यापैकी ६,०४२ तक्रारींची सुनावणी करण्यात आली, तर वर्षअखेरीस ३,०६६ प्रकरणे प्रलंबित होती.