शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

४०२ वैद्यकीय शिक्षकांना न्याय

By admin | Updated: September 11, 2015 03:24 IST

राज्यात दोन वर्षांपेक्षा जास्त व आठ वर्षांपर्यंत तात्पुरती अधिव्याख्याता या पदाची सेवा देत असलेले ४०२ वैद्यकीय शिक्षक आहेत.

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची ग्वाही : एमएसएमटीएच्या बैठकीत मागण्यांना प्रतिसादनागपूर : राज्यात दोन वर्षांपेक्षा जास्त व आठ वर्षांपर्यंत तात्पुरती अधिव्याख्याता या पदाची सेवा देत असलेले ४०२ वैद्यकीय शिक्षक आहेत. हा अनुशेष मागील सहा वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा निवड मंडळाद्वारे जाहिराती देऊन न भरल्यामुळे निर्माण झाला आहे. तात्पुरत्या स्वरूपात सेवा देणाऱ्या या वैद्यकीय शिक्षकांच्या सेवा नियमित करण्याच्या मागणीला घेऊन वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सकारात्मक भूमिका घेत, ही मागणी मंत्रिमंडळात मांडण्याचे व ते तडीस नेण्याची ग्वाही दिली. वैद्यकीय शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांना घेऊन ९ सप्टेंबर रोजी सह्याद्रीवर वैद्यकीय शिक्षणमंत्री तावडे व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशनची (एमएसएमटीए) बैठक बोलविली होती. यावेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच राज्यातील वैद्यकीय शिक्षकांच्या मागण्यांना घेऊन हे दोन्ही मंत्री गंभीर असल्याने अनेक मागण्या निकाली निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या बैठकीत महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. मकरंद व्यवहारे यांनी पॉवर पॉर्इंटच्या मदतीने असोसिएशनच्या मागण्या मांडल्या. डॉ. व्यवहारे म्हणाले, गेल्या कित्येक वर्षांपासून अधिव्याख्याता वेतनवाढीपासून वंचित आहेत. त्यांच्यावर तात्पुरती सेवा टांगती तलावर कायम आहे. असे असतानाही ते अविरतपणे आपली सेवा देत आहे. यामुळेच वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी या मागणीला प्राधान्य दिले आहे.बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसचिव सोनवणे, सहायक संचालक डॉ. प्रकाश वाकोडे, मुख्य प्रशासकीय अधिकारी बरघरे, एमएसएमटीचे गिरीश ठाकूर, डॉ. राजेश जाधव, डॉ. संजय मोरे, डॉ. अनिल बत्रा, डॉ. संजयकुमार तांबे, डॉ. अनंत शिंगारे यांच्यासह सर्व पदाधिकारी व १४ ही मेडिकल महाविद्यालयाच्या मेडिकल टीचर्स असोसिएशनचे सचिव व अध्यक्ष उपस्थित होते.-५८ नंतर स्वेच्छानिवृत्तीचा विचार होणारडॉ. व्यवहारे म्हणाले, बैठकीत असोसिएशनतर्फे ५८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना शासकीय सेवा पुढे चालू ठेवायची आहे किंवा नाही याबाबत शासनाने विचारणा करण्याची मागणी मांडण्यात आली. यावर वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी या मागणीचे स्वागत करीत यावर लवकरच आदेश काढण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या शिवाय बंधपात्रित उमेदवारांना वरिष्ठ निवासी डॉक्टर व ट्युटर या पदावर नियुक्ती देण्याची व केंद्रशासन पुरस्कृत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कालबद्ध पदोन्नतीची प्रथा राज्यात राबविण्याच्या मागणीलाही मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. रोध भत्त्यावर १५ दिवसांत निर्णय-मुनगंटीवारसहाव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीनुसार वेतन निश्चित करताना ठरवलेली ८५ हजार रुपयांची कमाल मर्यादा शिथिल करण्याच्या मागणीला घेऊन डॉ. व्यवहारे यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना तीन पर्याय सुचविले. यावर १५ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळण्याबाबत व इतरही मागण्यांना घेऊन त्यांनी वैद्यकीय शिक्षकांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली.