टाकळघाट : चाेरट्याने घरफाेडी करीत ४० हजार रुपये किमतीचे साेन्याचे मंगळसूत्र चाेरून नेल्याची घटना एमआयडीसी बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील टाकळघाट येथे घडली.
प्रीती आशिष तितरे (२९, सिल्लेझरी, ता. नागभिड, जिल्हा चंद्रपूर) या नाेकरीनिमित्त टाकळघाट, ता. हिंगणा येथे किरायाने राहतात. त्या गावाला गेल्या असता, चाेरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला आणि बॅगेतील साेन्याचे मंगळसूत्र चाेरून नेले. ही बाब लक्षात येताच त्यांनी पाेलिसात तक्रार नाेंदवली. शिवाय, या मंगळसूत्राची किंमत ४० हजार रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. टाकळघाट येथील २५ वर्षीय महिलेले ते मंगळसूत्र चाेरले असून, ते टाकळघाट येथील एका ज्वेलरकडे गहाण ठेवल्याची माहिती पाेलिसांनी दिली. याप्रकरणी एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांनी त्या महिलेविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. वृत्त लिहिसताे आराेपीस महिलेस अटक करण्यात आली नव्हती.