शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
3
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
4
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
5
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
6
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
7
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
8
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
9
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
10
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
11
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
12
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
13
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
14
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
15
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
16
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
17
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
19
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
20
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”

विकास कामांवर ३७७ कोटी खर्च

By admin | Updated: June 19, 2015 02:37 IST

सन २००१ ते २०१५ या कालावधीत नासुप्रकडे ४५९.६८ कोटी रुपये निधी जमा झाला असून या निधीतून आतापर्यंत रस्ते, ....

नागपूर : सन २००१ ते २०१५ या कालावधीत नासुप्रकडे ४५९.६८ कोटी रुपये निधी जमा झाला असून या निधीतून आतापर्यंत रस्ते, स्टॉर्म वॉटर ड्रेन, मलवाहिका आदी कामांसाठी ३०३.६६ कोटी रुपये आणि पिण्याची पाईप लाईन टाकण्यासाठी ७३.९८ कोटी रुपये असे एकूण ३७७ कोटी रुपये खर्च केले असल्याचा दावा, नागपूर सुधार प्रन्यासने केला आहे.. कायद्यातील तरतुदीनुसार ६८.९५ कोटी रुपयाचा निधी प्रशासकीय खर्चासाठी वापरण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. नागपूर सुधार प्रन्यासचे लेखा व वित्त अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमान्वये नागपूर सुधार प्रन्यासला ५७२/१९०० अनधिकृत अभिन्यासाचा विकास करण्याची जबाबदारी राज्य शासनाने दिलेली आहे. त्यासाठी संबंधित अभिन्यासातील भूखंडधारकांकडून विकास शुल्क वसुल करण्याची तरतूद आहे. सन २००१ ते २०१५ पर्यंत उपरोक्त नमूद अभिन्यासातून ४५९.६८ कोटी रुपयाचा निधी जमा झाला. त्या निधीतून बहुतांश सुविधांची कामे करण्यात आली. त्यावर ३०३.६६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. या अभिन्यासामध्ये पिण्याची पाण्याची पाईप लाईन टाकण्यासाठी नासुप्रने ७३.९८ कोटी खर्च केले. त्यामुळे आजपर्यंत नासुप्रने ३७७ कोटी विकास कामावर खर्च केलेला आहे. तसेच गुंठेवारी अभिन्यासातील परिच्छेद क्रमांक ६(१) नुसार नासुप्रला पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी १५ टक्के रक्कम नियोजन प्राधिकरण प्रशासनिक खर्चासाठी ठेवून घेईल, अशा प्रकारची तरतूद आहे. या तरतुदीनुसारच ६८.९५ कोटाचा निधी प्रसासकीय खर्चासाठी वापरण्यात आला. त्यामुळे ३७७ कोटी आणि प्रशासकीय खर्च ६८.९८ कोटी असे एकूण ४४६.६० कोटी रुपये विकास कामावर खर्च झालेला आहे. उर्वरित १३.०८ कोटीचा निधी जो शिल्लक आहे. त्या निधीतून आजही उपरोक्त ले-आऊटमध्ये बहुतांश सुविधा पुरवण्याचे काम सुरू आहे. आजच्या तारखेला विविध ले-आऊटमध्ये ४० कोटीपेक्षा जास्त रकमेचे काम सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)