शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

जिल्ह्याच्या विकासासाठी ३७२.६० कोटी

By admin | Updated: February 2, 2016 02:36 IST

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत...

जिल्हा नियोजन समितीची सभा : पालकमंत्री बावनकुळे यांनी घेतला आढावानागपूर : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत २०१६-१७ या वर्षाकरिता शासनाने निर्धारित करून दिलेल्या आर्थिक विहित मर्यादेत ३७२.६० कोटी रुपये नियतव्ययाच्या जिल्हा वार्षिक योजनेस मान्यता देण्यात आली.डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सोमवारी जिल्हा नियोजन समितीची सभा पार पडली. सभेनंतर पालकमंत्र्यांनी पत्रकारांना यासंबंधात माहिती दिली. या सभेस २०१५-१६ च्या डिसेंबर-२०१५ अखेर झालेल्या आर्थिक व भौतिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. याशिवाय २०१५-१६ पुनर्विनियोजनाच्या प्रस्तावास मान्यता प्रदान करण्यात आली.या सभेस खासदार कृपाल तुमाने, महापौर प्रवीण दटके, आमदार सुनील केदार, आमदार कृष्णा खोपडे, आमदार समीर मेघे, आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार प्रकाश गजभिये, आमदार आशिष देशमुख, आमदार सुधाकर कोहळे, आमदार सुधीर पारवे, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, आमदार गिरीश व्यास, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, आदिवासी अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे, मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजी जोंधळे, माजी आमदार अ‍ॅड. आशिष जयस्वाल, रमेश मानकर व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.२०१६-१७ या वर्षाच्या योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या आधारे व निर्धारित करून दिलेल्या आर्थिक विहित मर्यादेत प्रारूप सभेसमोर ठेवण्यात आले. यंत्रणांकडून सर्वसाधारण योजनेंतर्गत ४७९.६३ कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेत १४५.५३ कोटी, आदिवासी उपयोजनेत ५०.६४ कोटी, ओटीएसपीअंतर्गत ५८.९८ कोटी रुपयांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. ३१ मार्चपर्यंत निधी खर्च झालाच पाहिजे यावेळी २०१५-१६ च्या जिल्हा वार्षिक योजनेचा खर्चाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा वार्षिक योजना २०१५-१६ च्या डिसेंबर २०१५ अखेर २३७.९७ कोटी रुपयाचा खर्च झाला. वितरित निधीशी खचार्ची टक्केवारी ६०.८३ टक्के आहे. ३९१.१९ कोटी रुपयांचा निधी विविध यंत्रणांना वितरित करण्यात आला होता. शासनाकडून ४५४.६६ कोटी रुपये उपलब्ध झाले होते. यावर पालकमंत्र्यांनी असमाधान व्यक्त करीत काहीही करा येत्या ३१ मार्च २०१६ पर्यंत उर्वरित निधी खर्च झालाच पाहिजे, असे निर्देश दिले.दीक्षाभूमीसाठी केंद्राकडून नऊ कोटी मंजूर दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळात सामील करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जन्मदिनानिमित्त दीक्षाभूमीच्या विकासासाठीसुद्धा एक प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यात केंद्र सरकारने नऊ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला असून, त्यातील ४ कोटी ७२ लाख रुपयाचा पहिला हप्तासुद्धा पाठविला आहे. या निधीतून दीक्षाभूमीचा विकास केला जाईल, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. शताब्दी भवन व श्याम हॉटेलसंबंधात लवकरच बैठक पटवर्धन मैदानावर होणाऱ्या शताब्दी स्मारक, श्याम हॉटेल, चिचोली येथील डॉ. आंबेडकर वस्तू संग्रहालय यासंबंधातील अडचणी सोडविण्यासाठी लवकरच एक बैठक घेण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.