शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हर्टिकल फार्मिंग’च्या नावाखाली गुंतवणूकदारांची ३.६७ कोटींनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2023 22:08 IST

Nagpur News ‘व्हर्टिकल फार्मिंग’च्या नावाखाली गुंतवणूकदारांची ३.६७ कोटींनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात ए.एस.ॲग्री अँड ॲक्वा एलएलपी या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांसह चार आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नागपूर : ‘व्हर्टिकल फार्मिंग’च्या नावाखाली गुंतवणूकदारांची ३.६७ कोटींनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात ए.एस.ॲग्री अँड ॲक्वा एलएलपी या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांसह चार आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कंपनीने गुंतवणूकदारांच्या जागेवर पॉलीहाऊस बांधून देण्याचेदेखील आश्वासन दिले होते. नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतर्फे या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

निकुंज शशीकांत दोशी (७०, फार्मलँड, रामदासपेठ) असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. तर प्रशांत झाडे (सॅलेसबरी सोसायटी, अंबरनाथ, ठाणे), भाटु ठाकरे,  संदेश खामकर( ठाणे) व हिरेन पटेल अशी आरोपींची नावे आहेत. निकुंज दोशी यांना संबंधित कंपनीबाबत माहिती मिळाली. यात पैसे गुंतविले असता चांगला परतावा मिळत असल्याचे त्यांना आमिष दाखविण्यात आले. आरोपींना त्यांना व्हर्टिकल फार्मिंगच्या विविध योजनांची माहिती दिली. पैसे गुंतविल्यानंतर कंपनी गुंतवणुकदारांच्या जागेवर पाॅलीहाऊस बांधून देईल. तसेच तांत्रिक मदत करणाऱ्या व्यक्तींचा खर्च व इतर साहाय्यदेखील करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

प्रत्येक वर्षाला १०० टक्के असा १२ वर्ष परतावा मिळेल असे आमिष दाखविण्यात आले. या प्रकल्पाचा खर्च १.०८ कोटी असून गुंतवणूकदारांना ४० लाखच गुंतवावे लागणार असल्याचा दावा आरोपींनी केला. निकुंज दोशी यांनी व त्यांचा मुलगा रिशी यांनी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. निकुंज दोशी यांनी ४० लाख गुंतविले. १५ महिन्यांच्या आत ३६ लाख रुपये मिळतील असे सांगण्यात आले. दोशी यांनी त्यांच्या शेतीतील १६ गुंठ्यामध्ये मे २०२२ मध्ये पॉलिहाऊस शेडदेखील तयार केले. कंपनीने त्यांना पाच लाख रुपये खर्चदेखील करायला लावला. मात्र कंपनीने त्यांना कुठलाही परतावा दिला नाही. निकुंज दोशी यांच्यासह आणखी चार गुंतवणूकदारांनी यात पैसे गुंतविले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दोशी यांनी नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.