शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातून  ३६ जणांची वैद्यकीय चमू जाणार केरळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 22:21 IST

केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांसोबतच आता वैद्यकीय शिक्षण विभागही पुढे आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागानेही राज्यातील सर्व उपसंचालकांना आपली वैद्यकीय चमू तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर मंडळाची ३६ जणांची वैद्यकीय चमू केरळला जाण्यासाठी तयार झाली आहे. आदेश येताच ही चमू केरळसाठी रवाना होईल.

ठळक मुद्दे उपसंचालक आरोग्य विभागाचा पुढाकार : चमूमध्ये डॉक्टरांसह परिचारिका, तंत्रज्ञ व अटेंडंटचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांसोबतच आता वैद्यकीय शिक्षण विभागही पुढे आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागानेही राज्यातील सर्व उपसंचालकांना आपली वैद्यकीय चमू तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर मंडळाची ३६ जणांची वैद्यकीय चमू केरळला जाण्यासाठी तयार झाली आहे. आदेश येताच ही चमू केरळसाठी रवाना होईल.केरळ पूरग्रस्तांना सर्वाधिक गरज वैद्यकीय सेवेची आहे. सोमवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जे.जे. रुग्णालयातील १०० वैद्यकीय चमू केरळकडे रवाना झाली. काही वैद्यकीय विद्यार्थी औषधांची जुळवाजुळव करण्यासाठी सरसावले आहेत. यात आता सार्वजनिक आरोग्य विभागानेही पुढाकार दाखवीत उपसंचालकस्तरावर वैद्यकीय चमू तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नागपूर आरोग्य विभागाचे उपसंचालक यांनी ३६ जणांची वैद्यकीय चमू तयार केली आहे. यात डॉक्टरांसह परिचारिका, तंत्रज्ञ व अटेंडंट आदींचा समावेश आहे. डॉक्टरांमध्ये फिजिशियन, शल्यचिकित्सक, स्त्रीरोग तत्ज्ञ, बालरोग तज्ज्ञाचा समावेश आहे. केरळला रवाना होण्यासाठी ही चमू पुढील आदेशाची वाट पाहत आहे. विशेष म्हणजे, नागपुरातील डॉक्टरांच्या चमूने यापूर्वी नेपाळमधील भूकंपग्रस्तांना वैद्यकीयसेवा दिली आहे.वैद्यकीय चमूत १७ डॉक्टरसंचालनालयाच्या सूचनेवरून केरळ येथे आरोग्यसेवा देण्यासाठी ३६ जणांची चमू तयार करण्यात आली आहे. यात १७ डॉक्टरांसह परिचारिका, तंत्रज्ञ व अटेंडंटचा समावेश आहे. निर्देश येताच ही चमू केरळकडे रवाना होईल.डॉ. संजय जयस्वालउपसंचालक, आरोग्य विभाग, नागपूर मंडळ

टॅग्स :doctorडॉक्टरKeralaकेरळ