शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

३५.६० लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : विना रॉयल्टी रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध भिवापूर पाेलिसांनी कंबर कसली आहे. दाेन दिवसात दाेन ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : विना रॉयल्टी रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध भिवापूर पाेलिसांनी कंबर कसली आहे. दाेन दिवसात दाेन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत रेतीसाठ्यासह ३५ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात चालक व मालक अशा चाैघांविरुद्ध गुन्हा नाेंदवून आराेपींना अटक केली आहे. भिवापूर पाेलिसांच्या या कारवाईमुळे रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहे.

अटक करण्यात आलेल्या आराेपींंमध्ये प्रशांत शेषराव अवचट (२३, रा. दिघोरी, ता. लाखांदूर, जि. भंडारा), सोमेश्वर प्रोफेसर वावरे (२४, रा. इरवा ता. नागभीड जि. चंद्रपूर), नीतेश मनोहर मोटघरे (२५, रा. विरलीखंडा, जि. भंडारा) व विठ्ठल सहादेव राऊत (४०, रा. सुरगाव, ता. उमरेड) यांचा समावेश आहे. पहिली कारवाई साेमवारी (दि.२१) मध्यरात्रीच्या सुमारास राष्ट्रीय मार्गावरील पोलीस टी-पाॅईंट परिसरात करण्यात आली. रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर यांच्या निर्देशानुसार पाेलिसांनी सापळा रचला. दरम्यान एमएच-३६/एएफ-३८२१ क्रमांकाच्या भरधाव टिप्परला थांबवून तपासणी केली असता, विना रॉयल्टी सहा ब्रास रेतीसाठा आढळून आला.

महामार्गावरील मानोरा शिवारात रविवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास करण्यात आलेल्या दुसऱ्या कारवाईत एमएच-४०/बीजी-४९५८ क्रमांकाच्या टिप्परमधून विना रॉयल्टी सहा ब्रास रेती जप्त करण्यात आली. या दाेन्ही कारवाईमध्ये ६० हजार रुपये किमतीची १२ ब्रास रेती व ३५ लाख रूपये किंमतीचे दोन टिप्पर असा एकूण ३५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी आरोपी मालक व चालकाविरुध्द भादंविच्या कलम ३७९, १०९ सहकलम ‌१८४, १७७, १७९ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला आहे. ही कारवाई ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या नेतृत्वात वाहतूक पोलीस राकेश त्रिपाठी, अजय झाडे, दीपक जाधव, नरेंद्र पटले, चंद्रकांत रेवतकर, राजेंद्र डहाके, डोईफोडे यांच्या पथकाने केली.