शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सुंदर महिलांचा वापर व परताव्याचे आमिष दाखवून ३५० कोटी लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 10:54 IST

Nagpur News दहा दिवसातच एक लाखाचे १.३० लाख रुपये परत करण्यासह अनेक आमिषे दाखवून इबिड ट्रेडर्सच्या नावाखाली सुनील कडियाला या ठकबाजाने देशभरातील लोकांची ३५० कोटींपेक्षा अधिक रकमेने फसवणूक केली आहे.

ठळक मुद्देबालाघाटमध्ये दोन साथीदारांसह सूत्रधार अटकेत

जगदीश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दहा दिवसातच एक लाखाचे १.३० लाख रुपये परत करण्यासह अनेक आमिषे दाखवून इबिड ट्रेडर्सच्या नावाखाली सुनील कडियाला या ठकबाजाने देशभरातील लोकांची ३५० कोटींपेक्षा अधिक रकमेने फसवणूक केली आहे. नागपूरमध्ये एकाच वर्षात दोन कार्यालये उघडून २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम त्याने हडपली. सुनील कडियाला, त्याचा साथीदार शेखर कुमार आणि स्वाती लक्षणे यांना बालाघाट येथून अटक करण्यात आली आहे.कडियाला, त्याची पत्नी, साडभाऊ, भाऊ आणि त्याची पत्नी हे या रॅकेटचे सूत्रधार आहेत. सुनील मूळचा आंध्रप्रदेशातील अनंतपुरमचा रहिवासी आहे. त्याने २०२० मध्ये कळमनाच्या ओमनगरात तसेच १५ आॅगस्ट २०२० रोजी माटे चौकात कार्यालय सुरू केले. तो १० दिवसात गुंतवणुकीवर ३० टक्के किंवा ३५ दिवसात ४५ टक्के अतिरिक्त रक्कम परत करण्याचे आमिष दाखवित होता. सुरुवातीला त्याने रक्कम परत केल्यामुळे इबिड ट्रेडिंगची माहिती सगळीकडे पसरली. डिसेंबर २०२० नंतर कोरोना आणि दुसरे कारण सांगून त्याने पैसे देणे बंद केले. अनंतपुरममध्ये ३०० कोटींपेक्षा अधिक रक्कम हडपली. एप्रिल २०२१ मध्ये अनंतपुरम पोलिसांनी कडियाला आणि त्याच्या कुटुंबीयांसह १३ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. नागपूरवरून फरार झाल्यानंतर कडियालाने रायपूरमध्ये चांपा येथे कार्यालय सुरू केले. सुनीलजवळ मर्सिडिज, जग्वार, फॉर्च्युनरसारख्या सात-आठ लक्झरी कारचा काफिला असल्यामुळे गुंतवणूकदार त्याला मोठा व्यक्ती समजत होते. १५ दिवसांपूर्वी निखिल वासेने १२ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर इतर पीडितही गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले. बजाजनगर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली असता कडियाला आणि इतर दोघे बालाघाटमध्ये पोलिसांच्या हाती लागले.सुंदर महिलांचा वापरकडियाला नागरिकांना फसविण्यासाठी सुंदर महिलांना व्यवस्थापक आणि एजंट म्हणून नियुक्त करीत होता. एखाद्याने गुंतवणूक करण्यास नकार दिल्यास या महिला त्याची भेट घेऊन त्याला गुंतवणुकीस प्रवृत्त करीत होत्या. पैशांसाठी दबाव टाकल्यास या सुंदर महिला त्यांना शांत करण्याचे काम करीत होत्या. यामुळे अनेक गुंतवणूकदार फसवणूक झाल्यानंतरही तक्रार करण्यासाठी धजावत नसल्याची स्थिती आहे.गुंतवणूकदाराची आत्महत्याआरोपींनी फसवणूक केल्यामुळे कळमनातील एका व्यक्तीने चार महिन्यांपूर्वी आत्महत्या केली आहे. त्याने १० वर्षात जमविलेले पैसे आरोपींनी हडपले. प्रयत्न करूनही त्याला पैसे परत करण्यात येत नव्हते. त्यामुळे हताश होऊन त्याने आत्महत्या केली. पोलिसांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

 

टॅग्स :fraudधोकेबाजी