शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

डबल डेकर पुलासाठी ३५० कोटींची गुंतवणूक

By admin | Updated: May 12, 2017 03:02 IST

वर्धा रोडवर डबल डेकर पुलाचे काम सुरू झाले आहे. प्राईड हॉटेलसमोर आणि अजनी चौकातील हॉस्पिटलसमोर एकूण १० पिलरचे बांधकाम करण्यात येत आहे.

पिलरचे बांधकाम सुरू : ३.१४ कि़मी. पुलासाठी १६० पिलर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वर्धा रोडवर डबल डेकर पुलाचे काम सुरू झाले आहे. प्राईड हॉटेलसमोर आणि अजनी चौकातील हॉस्पिटलसमोर एकूण १० पिलरचे बांधकाम करण्यात येत आहे. हे पिलर मेट्रो रेल्वेच्या पिलरपेक्षा वेगळे आहेत. डबल डेकर पुलाच्या उभारणीकरिता ३५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. जवळपास ३.१४ कि़मी. डबल डेकर पुलाच्या निर्मितीसाठी पिलरची उंची पूर्वी ५.५ मीटर आणि त्यानंतर १५ ते १८ मीटर राहील. या मार्गावर एकूण १०६ पिलर उभारण्यात येणार आहे. सोनेगांव पोलीस ठाण्याजवळून ते अजनी चौकातील हॉस्पिटलपर्यंत बांधण्यात येणाऱ्या डबल डेकर पुलाची लांबी ३.१४ कि़मी. राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) सूत्रांनी दिली. या मार्गावर तीन मेट्रो स्टेशन सहा पदरी पुलाच्या पिलरचा व्यास अडीच ते तीन मीटर आणि चार पदरी पिलरचा व्यास दीड ते दोन मीटर निश्चित केला आहे. डबल डेकर पुलावर मेट्रो रेल्वेचे उज्ज्वलनगर, जयप्रकाशनगर आणि छत्रपतीनगर या तीन मेट्रो स्टेशनचे बांधकाम करण्यात येणार आहे. पुलाची जबाबदारी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनवर (महामेट्रो) सोपविण्यात आली आहे. महामेट्रोने निर्मितीचे काम नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. या पुलाचे बांधकाम एक वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे. ‘मनीषनगर आरयूबी’चा कार्यारंभ महामेट्रोच्या देखरेखीत नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीने ९१ कोटींच्या गुंतवणुकीतून मनीषनगर ते उज्ज्वलनगरपर्यंत रेल्वे भूमिगत पुलाचे (आरयूबी) बांधकाम सुरू केले आहे. हा आरयूबी उज्ज्वलनगरहून डबल डेकर पुलाला जोडण्यात येणार आहे. पूल सहा पदरी राहणार आहे. उज्ज्वलनगर मैदानावरसुद्धा ‘जंक्शन’चे बांधकाम सुरू झाले आहे. मनीषनगर रेल्वे क्रॉसिंगकरिता चार पदरी भूमिगत पूल बनविण्यात येणार आहे. त्यासाठी रिलायन्स फ्रेशसमोर बांधकाम सुरू झाले आहे. हा चार पदरी भूमिगत पूल उज्ज्वलनगरला जोडण्यात येणार आहे. याकरिता उज्ज्वलनगर मैदानावर सब-वे बनविण्यात येणार आहे. १०० मीटर लांब आरयूबीचे बांधकाम १८ महिन्यात पूर्ण होणार आहे.