शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

३५ कोटींचा निधी नागपूर मनपा पदाधिकाऱ्यांनी पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 22:00 IST

महापालिका आयुक्तांनी फाईल मंजुरीवरील निर्बंध मागे घेतल्याने प्रभागातील रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे होतील अशी अपेक्षा नगरसेवकांना होती. यासाठी अर्थसंकल्पात ३५ कोटींची तरतूद असल्याने निर्बंध मागे घेताच नगरसेवक स्वत: रस्ते दुरुस्ती व डांबकरणाच्या फाईल घेऊ न आले. परंतु फाईल सादर करण्यापूर्वीच पदाधिकाऱ्यांनी हा निधी हातोहात पळविल्याने नगरसेवकांचा भ्रमनिरास झाला आहे.

ठळक मुद्देएकाच भागातील कामांना मंजुरी : नगरसेवकांचा भ्रमनिरास : फाईल मंजुरीसाठी नगरसेवकांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका आयुक्तांनी फाईल मंजुरीवरील निर्बंध मागे घेतल्याने प्रभागातील रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे होतील अशी अपेक्षा नगरसेवकांना होती. यासाठी अर्थसंकल्पात ३५ कोटींची तरतूद असल्याने निर्बंध मागे घेताच नगरसेवक स्वत: रस्ते दुरुस्ती व डांबकरणाच्या फाईल घेऊ न आले. परंतु फाईल सादर करण्यापूर्वीच पदाधिकाऱ्यांनी हा निधी हातोहात पळविल्याने नगरसेवकांचा भ्रमनिरास झाला आहे.महापालिके ची आर्थिक स्थिती विचारात घेता आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी फाईल मंजुरीवर निर्बंध घातले होते. परंतु पदाधिकारी व नगरसेवकांचा विरोध लक्षात घेता आयुक्तांनी निर्बंध मागे घेतले. यात यात रस्ते सुधारणा व पुलांच्या बांधकामांचा समावेश होता. शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण व दुरुस्ती काँक्रिटीकरण यांसाठी ३५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. परंतु ही तरतूद हातोहात संपल्याने बहुसंख्य नगरसेवक ांच्या फाईलला मंजुरी मिळालेली नाही.रस्ते सुधारणा व निर्माण पुलाची दुरुस्ती व निर्माण यासाठी भांडवली व महसुली अशा स्वरुपाची १९५.८१ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. यातील रस्ते दुरुस्ती व डांबरीकरण व काँक्रिटीकरणाच्या व्ययपद क्रमांक ए २२००१३३०८०२ मध्ये ३५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आयुक्तांनी या व्ययाच्या शीर्षकावरील निर्बंध मागे घेतल्याने शुक्रवारी नगरसेवकांनी फाईल मंजुरीसाठी महापालिकेत गर्दी केली होती. मात्र फाईल सादर करण्यापूर्वीच हा निधी संपल्याचे वित्त विभागाकडून सांगण्यात आल्याची माहिती नगरसेवकांनी दिली.खड्डे दुरुस्तीसाठी ८ कोटी, हॉटमिक्सतर्फे खड्डे दुरुस्तीसाठी १० कोटी, पुलाची दुरुस्ती ९.३५ कोटी, शहरातील नवीन रस्ते ३ कोटी, नवीन पूल ८ कोटी, शहर विकास योजनेचा प्रस्तावित आराखडा तयार करणे व विकास योजनांची अंमलबजावणी यासाठी २५ कोटी, एरवियो, मुख्य रस्त्यांची दुरुस्ती यासाठी १० कोटी अशा स्वरुपाची तरतूद करण्यात आली आहे. परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता निर्बंध मागे घेतले तरी निधी उपलब्ध नसल्याने फाईल मंजुरीचा मार्ग बंदच आहे.विद्युत विभागासाठी १५६.२० कोटींची तरतूदशहरातील पथदिव्यांचा मुद्दा उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. विद्युत विभागासाठी १५६.२० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. यात पथदिव्यांची दुरुस्ती, नवीन पथदिवे, रस्त्यावरील विजेचे खांब हटविणे, वाहतूक सिग्नल, पथदिव्यांच्या दुरुस्ती व अन्य कामांचा समावेश आहे.प्रभागातील विकास कामे कशी होणारमहापालिकेच्या सर्व प्रभागाचा विकास करण्याची जबाबदारी पदाधिकारी व प्रशासनाची आहे. परंतु पदाधिकारीच निधी आपल्या भागात पळवित असतील तर नगरसेवकांनी न्याय कुणाला मागावा, प्रभागातील विकास कामे कशी होतील. असा प्रश्न नगरसेवकांना पडला आहे.सभागृहात मुद्दा गाजणारफाईल मंजूर होत नसल्याने नगरसेवक नाराज असून काही नगरसेवकांनी प्रभागनिहाय किती निधी मंजूर करण्यात आला. याची माहिती अधिकारात माहिती मागितलेली आहे. माहिती प्राप्त होताच हा सभागृहात उपस्थित क रण्याची तयारी नगरसेवकांची चालविली आहे. निधी वाटपातील अन्याय खपवून घेणार नसल्याचा इशारा भाजपाच्याच काही नगरसेवकांनी दिला आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfundsनिधी