शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे ३३४ मतदार सहलीला, काँग्रेसच्या हाती कुणी लागेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 16:26 IST

काँग्रेस नेत्यांकडून घोडेबाजार करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. आपल्या मतदारांना प्रलोभने दिली जात आहेत, असा दावा करत भाजपने आपले ३३४ मतदार सहलीला पाठवले आहेत. हे सर्व मतदार ९ डिसेंबरच्या रात्री परततील.

ठळक मुद्देबावनकुळेंनी सोडला सुटकेचा श्वास काँग्रेस म्हणते, निकाल फिरणारच

नागपूर : विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने भाजप-संघ परिवारातील उमेदवार घेतला. काँग्रेसच्या या चालीपासून सावध भूमिका घेत भाजपने लागलीच आपले मतदार एकत्र केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने आपल्या ३३४ मतदारांना पर्यटनाला पाठवून सुटकेचा श्वास सोडला आहे.

भाजपकडून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात काँग्रेसने रवींद्र भोयर यांना रिंगणात उतरवले आहे. अपक्ष मंगेश देशमुख यांनीही माघार घेतलेली नाही. भाजपचे संख्याबळ जास्त असले, तरी आपले मतदार फुटू नयेत म्हणून अधिक काळजी घेतली जात आहे.

काँग्रेस नेत्यांकडून घोडेबाजार करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. आपल्या मतदारांना प्रलोभने दिली जात आहेत, असा दावा करत भाजपने आपले ३३४ मतदार सहलीला पाठवले आहेत. हे सर्व मतदार ९ डिसेंबरच्या रात्री परततील. विजयासाठी २५६ मतांची आवश्यकता आहे. बहुमतासाठी लागणाऱ्या आकड्यापेक्षा जास्त मतदार आधीच पर्यटनासाठी रवाना केल्यामुळे बावनकुळे यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

महाविकास आघाडीची भिस्त पालकमंत्री नितीन राऊत व क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यावर आहे. काँग्रेस नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या मतदारांसह बसपा, अपक्ष व इतर मतदारांना संपर्क साधला जात आहे. भाजपमध्ये अंतर्गत खदखद आहे. आपले मतदार नाराजीतून फुटतील, या भीतीने भाजपने मतदारांना पर्यटनासाठी नेले आहे. मात्र, निकालानंतर चित्र बदललेले दिसेल, असा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक मनावर घेतली असताना, ३३४ मतदार एकत्र करून रवाना केले असताना त्यातील एक मोठा गट फुटेल का, हा प्रश्नच आहे.

भाजप नगरसेवक सहकुटुंब रवाना

भाजपच्या नगरसेवकांसोबत त्यांचे कुटुंबीयही पिकनिकसाठी रवाना झाले. रविवारी रात्री भाजपचे काही नगरसेवक गोवा व महाबळेश्वरच्या पिकनिकसाठी रवाना झाले. तर सोमवारी पुन्हा नगरसेवकाचे तीन गट रवाना झाले. आमदार कृष्णा खोपडे यांच्यासोबत नगरसेवकांचे एक पथक उज्जैनकडे बसने रवाना झाले. तेथून ते अहमदाबाद जाणार आहेत. रात्री ८.३० वाजता नगरसेवकांचा एक गट कर्नाटकसाठी रवाना झाला. कर्नाटकात नियम कडक केल्याने तेथील बंगळूरू विमानतळावर उतरून दिल्लीला रवाना होणार आहे. रात्री ११.३० वाजता एक गट जम्मू व उत्तराखंडसाठी रवाना झाला. 

परतल्यानंतर पेंच रिसोर्टमध्ये व्यवस्था

भाजपचे मतदार ८ डिसेंबर रोजी परत येणार आहेत. पिकनिकवरून परतल्यानंतर नगरसेवकांच्या कुटुंबीयांना घरी सोडण्यात येईल. तर संपूर्ण नगरसेवक पेंचमध्ये एका रिसोर्टवर थांबतील. तेथून सरळ मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर आणले जाईल.

टॅग्स :Politicsराजकारण