प्रतिपूर्ती योजनेत सुधारणा : विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत मिळेल योजनेचा लाभसुहास सुपासे - यवतमाळ२०१३-१४ या चालू वर्षात विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना व शिष्यवृत्तीचे ३३ लाख ३५ हजार ८५७ विद्यार्थी आॅनलाईन लाभार्थी ठरले आहेत. भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी प्रदाने १७ लाख ३४ हजार २०१, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती ४५ हजार ९६१, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती १० लाख ७० हजार ४६८, सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता ३ हजार ४१, नववी व दहावीतील मुला-मुलींना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती २७ हजार ७३८, व्यावसायिक पाठ्यक्रम निर्वाह भत्ता ३ हजार ४४८ व शासकीय वसतिगृह प्रवेश ४० हजार अशा एकूण ३३ लाख ३५ हजार ८५७ विद्यार्थ्यांचा आॅनलाईन लाभार्थी म्हणून समावेश झाला आहे. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व मॅट्रिकोत्तर शिक्षण फी, परीक्षा फी प्रदाने या दोन्ही योजना आॅनलाईन करण्यात आल्या आहे. शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात तर शिक्षण फी व परीक्षा फी महाविद्यालयाच्या बँक खात्यात जमा होते. २०१३-१४ मध्ये १७ लाख ३४ हजार २०१ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज भरलेले असून १ हजार ७३७.९३ कोटी इतक्या रकमेच्या शिष्यवृत्तीचे आणि शिक्षण फी व परीक्षा फीचे वाटप ई-स्कॉलरशिपच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती अंतर्गत २०१२-१३ पासून दहावीत ७५ टक्केपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या अकरावीतील विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट शिष्यवृत्ती जमा होत आहे. चालू वर्षात ४५ हजार ९६१ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज भरलेले असून १३.४१ कोटी या योजनेवर खर्च झाला आहे. ४४ हजार ७०५ विद्यार्थ्यांना या योजनेचा आॅनलाईन लाभ मिळाला आहे. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेंतर्गत चालू वर्षात १० लाख ७० हजार ४६८ विद्यार्थिनींनी आॅनलाईन अर्ज भरले असून ६६.९८ कोटी इतका खर्च झाला आहे. ८ लाख १२ हजार ५११ मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा झाली आहे. सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता ही योजनासुद्धा आॅनलाईन असून चालू वर्षात ३ हजार ४१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले आहेत. या योजनेवर २.७४ कोटी खर्च झाला असून १ हजार ५६४ विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे. अनुसूचित जातीच्या मुलामुलींना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेंतर्गत चालू वर्षात २७ हजार ७३८ मुला-मुलींनी आॅनलाईन अर्ज भरलेले आहेत. २.२७ कोटींच्या शिष्यवृत्तीचे वितरण ११ हजार २०३ विद्यार्थ्यांना आॅनलाईन करण्यात आले आहे. व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असलेल्या वसतिगृहामधील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजनेंतर्गत चालू वर्षात ४.१२ कोटी खर्च झाला असून या योजनेचा ३ हजार ४४८ विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. शासकीय वसतिगृहातील प्रवेश आॅनलाईन करणे या योजनेंतर्गत राज्यात ३८१ मागासवर्गीय मुलामुलींची ४० हजार विद्यार्थी क्षमता असलेली शासकीय वसतिगृहे आहेत. २०१४-१५ पासून याठिकाणी प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन करण्यात आलेली आहे. चालू वर्षात ३३ लाख ३५ हजार ८५७ विद्यार्थ्यांनी या विविध योजनांचा आॅनलाईन लाभ घेतला आहे. दरवर्षी उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाहीव्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या व पालकांचे वार्षिक उत्पन्न ४ लाख ५० हजाराच्या मर्यादेत असलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ दिल्यानंतर ही सवलत त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुज्ञेय राहील. अशा विद्यार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. शासन मान्यताप्राप्त खासगी विना अनुदानित व कायम विना अनुदानित संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रतिपूर्ती योजनेत सुधारणा केली आहे.इतर शैक्षणिक योजनाही आॅनलाईनसाठी प्रस्तावितअनेक महत्वपूर्ण शैक्षणिक योजना आॅनलाईन झाल्या असून यामध्ये अस्वच्छ व्यवसायातील पालकांच्या मुलांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, अनुसूचित जातीच्या १०० विद्यार्थ्यांना देशांतर्गत शिष्यवृत्ती, अनुसूचित जातीच्या ५० विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती, अनुदानित वसतिगृहांचे परीक्षण करणे या व्यतिरिक्त बायोमॅट्रीक्स सिस्टीमच्या माध्यमातून उपस्थिती अहवाल घेणे, बजेटचे वाटप व होणारा खर्च यावर या वेबसाईटच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्याचेही प्रस्तावित आहे.
शैक्षणिक योजनांचे ३३ लाख आॅनलाईन लाभार्थी
By admin | Updated: July 13, 2014 01:08 IST