शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
5
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
6
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
7
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
8
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
9
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
10
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
11
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
12
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
13
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
14
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
15
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार
16
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
17
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
18
जन्मभर विसरणार नाही असा धडा भारतास शिकवू; सिंधू जल करार स्थगितीमुळे पाकच्या धमक्या वाढल्या
19
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
20
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा

कन्व्हेन्शन सेंटरसाठी ३२५ कोटींचा प्रकल्प

By admin | Updated: August 27, 2016 02:03 IST

जिल्ह्यातील मौजा चिचोली (फेटरी कळमेश्वर रोड) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी दिवंगत वामनराव गोडबोले ...

नागपूर : जिल्ह्यातील मौजा चिचोली (फेटरी कळमेश्वर रोड) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी दिवंगत वामनराव गोडबोले यांच्या मालकीच्या जागेवर डॉ. बाबासाहेबांच्या वैयक्तिक वापरातील विविध वस्तूंचे संग्रहालय आहे. या प्रकल्पाची जागा कळमेश्वर रोडवर शहरापासून १५ किमी अंतरावर आहे. ११.५० एकर जागेवर हा प्रकल्प असून ५७ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आराखडा शुक्रवारी प्रस्तावित करण्यात आला. या प्रकल्पासाठी नासुप्रला आतापर्यंत १० कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे.या प्रकल्पात मेमोरियल अ‍ॅण्ड म्युझियम, मास ट्रेनिंग सेंटर, विपश्यना केंद्र, अनापान सत्ती केंद्र, मॉक्स रेसिडेन्स, कॅफेटेरिया, स्टॉल्स, डायनिंग हॉल, टीचर्स कॉटेजेस, स्टाफ क्वार्टर्स, वसतिगृह आदींचा समावेश आहे. या ठिकाणी असलेल्या बहुमोल वस्तूंचे संवर्धन जतन करण्याचे काम केंद्र शासनाच्या अखत्यारीतील एनआरएलसी या संस्थेला देण्यात आले आहे. त्यासाठी येणाऱ्या १ कोटी ८६ हजार ७८० रुपयांना मान्यता देण्यात आली. डॉ. आंबेडकरांच्या वस्तूंचे संवर्धनाचे काम सुरू झाले असून एनआरएलसी व नासुप्र यांच्यातील सामंजस्य करारानुसार राष्ट्रीय सांस्कृतिक संपदा संरक्षण अनुसंधान शाळा या संस्थेला अग्रीम म्हणून ३० लक्ष रुपये देण्यात आले आहेत. कामठी येथील ड्रॅगन पॅलेस येथे आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट थीम पार्क व कन्व्हेंशन सेंटरसाठी ३२५ कोटींचा प्रकल्प आराखडासुद्धा यावेळी प्रस्तावित करण्यात आला. ड्रॅगन पॅलेस येथे जगातील चीन, जपान, म्यानमार, इंडोनेशिया अशा दूरदूरच्या देशातून अनुयायी येतात. त्यांच्यासाठी बौद्ध धम्माच्या शिकवणुकीचे व प्रचार प्रसाराची सोय करणे आवश्यक आहे. बौद्ध यात्रेकरूंना एकाच वेळी विविध राज्यातील संस्कृतीसोबत बौद्ध धम्म कसा विकसित होत गेला याचे एकाग्र दर्शन घडणे आवश्यक आहे. त्यासाठी असे केंद्र उभारणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने ड्रॅगन पॅलेस येथे बौद्ध थीम पार्कचे बांधकाम व अन्य कामे या विकास आराखड्यातून तयार होणार आहेत. एकूण १६ कामे या आराखड्यात टप्याटप्याने केली जाणार आहे. या आराखड्यात आंतरराष्ट्रीय कन्व्हेंन्शन सेंटर, पर्यटकांसाठी हॉल, विपश्यना हॉल, बौद्ध थीम पार्क, संग्रहालय, लायब्ररी, परिसर विकास, पार्किंग, संरक्षण भिंत, स्वच्छतेच्या सोयी आदींचा समावेश आहे.(प्रतिनिधी)३१ ला पर्यटन-तीर्थक्षेत्र विकासावर दिल्लीत बैठकया तीनही स्थळांची विकास कामे झाल्यानंतर दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस यांना हा भाग देखभालीसाठी हस्तांतरित करण्यात येईल. चिचोली येथील प्रकल्प देखभाल करण्यास ज्या संस्था समोर येतील त्यांचा विचार करण्यात येईल.या संदर्भात येत्या ३१ आॅगस्ट रोजी दिल्लीत बैठक असून राज्य शासनामार्फत तीनही स्थळांचे आराखडे केंद्राकडे पाठवले जातील. दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे.पारडसिंगा-धापेवाडा-आदासा तीर्थक्षेत्र सर्किटजिल्ह्यातील पारडसिंगा-धापेवाडा-आदासा या तीर्थक्षेत्र विकासाच्या ९९ कोटींच्या विकास आराखड्याला जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिली. काटोल तालुक्यातील पारडसिंगा येथील चिंतामुनेश्वर शिवशक्ती गडमंदिर व सती अनसूया माता परिसर येथील ४४ कोटींचा विकास कामांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी वन खात्याची जमीन मिळाली आहे. शासनाने हा आराखडा ४४ ऐवजी २५ कोटींचा करण्याच्या सूचना दिल्या आहे. धापेवाडा येथे विकास कामाअंतर्गत ५ कोटी ३४ लाखांच्या कामांना मंजुरी दिली आहे. यातून घाट विकास, सिमेंट रस्त्याचे बांधकाम, पार्किंग, संरक्षण भिंत, धापेवाडा येथे सौंदर्यीकरण, विद्युत व्यवस्था ही कामे करण्यात येणार आहे. चिंतामुनेश्वर प्रकल्पाच्या २५कोटींच्या विकास आराखड्याला समितीने तत्वत: मान्यता दिली. आदासा, धापेवाडा, पारडसिंगा, वाकी, नारायणपूर व छोटा ताजबाग, तेलंगखेडी मंदीर, केळझर, गिरड हे दुसरे असे दोन तीर्थक्षेत्र व पर्यटन विकासाचे सर्किट एकमेकांना जोडले जाणार आहेत.रामटेकच्या विकासासाठी १७५ कोटीरामटेक शहराचा पर्यटन विकास आणि तीर्थक्षेत्र विकास करण्याच्या दृष्टीने १७५ कोटीच्या विकास आराखडा शासनाकडे प्रस्तावित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१३-१४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २०० कोटींचा रामटेक विकास आराखडा सादर करण्याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार हा आराखडा शुक्रवारी पालकमंत्र्यांनी मंजूर करून पाठविण्याच्या सूचना दिल्या. २०० कोटीच्या आराखड्यात काही कामे वगळण्यात आली असून सुधारित १७५ कोटीचा आराखडा प्रस्तावित मंजूर करण्यात आला. या आराखड्यात जी कामे करावयाची आहे, ती कामे उपवन संरक्षक, पुरातत्व विभाग, जतन सहायक, पर्यटन विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद रामटेक यांनी सुचवलेली आहेत. मंजूर रकमेपैकी नगर परिषद रामटेक ८२.७७ कोटी, वन विभाग १६.९३ कोटी, पर्यटन विकास महामंडळ ८६ लाख, पुरातत्व विभाग ५.७८ कोटी, जतन सहायक ४१.६९ कोटी, सार्वजनिक बांधकाम विभाग ४०.७० कोटी रुपयांची विकास कामे करणार आहेत.