शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

३१६५ नवीन तलाठी साझाची निर्मिती

By admin | Updated: May 18, 2017 02:39 IST

तलाठी साझा व महसूल मंडळ पुनर्रचनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालातील सर्व शिफारशी मान्य करून

पुनर्रचना समितीच्या अहवालातील शिफारशी मान्य : ५२८ नवी मंडळ कार्यालये होणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तलाठी साझा व महसूल मंडळ पुनर्रचनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालातील सर्व शिफारशी मान्य करून राज्यात ३ हजार १६५ नवीन तलाठी साझा तसेच ५२८ नव्या मंडळ कार्यालयाच्या निर्मितीला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी दिली. राज्यातील भौगोलिक, प्रादेशिक विविधता व इतर अनुषंगिक बाबीच्या आधारे तलाठी साझा पुनर्रचना विषय समितीने महानगरपालिका क्षेत्र, महानगरपालिका क्षेत्राचे १० कि.मी. पर्यंतचे क्षेत्र (झालर क्षेत्र), अ व ब नगरपालिका, अ व ब नगरपालिका क्षेत्राच्या ५ कि.मी. पर्यंतचे क्षेत्र, क वर्ग नगरपालिका, गिरीस्थान नगरपालिका व नगर पंचायती, ग्रामीण भाग, आदिवासी भाग, माडा, मिनीपाडा, टीएसपी तसेच तटीय क्षेत्राला महत्त्वाचे नवीन क्षेत्र म्हणून विचारात घेण्यात आले आहे. या निर्णयामुळे करवसुलीशिवाय भूमिअभिलेख विषयक बाबी, दुष्काळ-नैसर्गिक आपत्तीत मदत कार्य, जनगणना, निवडणुका, विशेष साहाय्य योजना, विविध दाखल्यांचे वाटप, आदी कामे गतीने होण्यास मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यात महानगरपालिका, अ व ब नगर परिषदा तसेच त्याचे परिघीय क्षेत्र आणि क वर्ग नगर परिषदा यांचा विचार करून या नागरी भागातील ४१५ व आदिवासी क्षेत्रातील ३५१ अशा एकूण ७६६ नवीन तलाठी साझे व १२८ महसूल मंडळांची निर्मिती २०१७-१८ या वर्षामध्ये करण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात २०१८-१९ मध्ये अ व ब वर्ग गावांसाठी ८०० साझे व १३३ महसूल मंडळे निर्माण करण्यात येतील, तर २०१९-२० व २०२०-२१ या वर्षात अनुक्रमे ८०० व ७९३ तलाठी साझे आणि १३३ व १३४ महसूल मंडळांची निर्मिती करण्यात येणार आहे.