शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

कोरोना संक्रमणकाळात ३.१४ लाख नवीन वीजजोडण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या मोठ्या लाटेतही महावितरणने तब्बल ३ लाख १४ हजार ४०९ नवीन वीजजोडण्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या मोठ्या लाटेतही महावितरणने तब्बल ३ लाख १४ हजार ४०९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. ही केवळ तीन महिन्यातील संख्या आहे. मार्च महिन्यात ६६,३१०, एप्रिलमध्ये १,४४,६५१ व मेमध्ये १,०३४४८ अशा उच्च व लघुदाबाच्या नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या.

यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव तीव्र स्वरुपात होता. त्यामुळे अत्यावश्यक वीजपुरवठ्याची सेवा देण्यासाठी महावितरणचे अभियंता व कर्मचारी युद्धपातळीवर अहोरात्र कर्तव्य बजावत होते. सोबतच तातडीच्या आवश्यकतेनुसार ऑक्सिजन प्लांट, नवीन कोविड रुग्णालये, विलगीकरण कक्ष, लसीकरण केद्रांना केवळ २४ ते ४८ तासांमध्ये नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार देण्यात आले.

कोरोनाच्या गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत महावितरणने ग्राहकसेवेचे कर्तव्य चोखपणे बजावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांच्या कालावधीत उच्चदाब वर्गवारीमध्ये उद्योग- १७९, वाणिज्यिक- २४, कृषी- ७ आणि इतर ४० अशा एकूण २५० नवीन वीजजोडण्या तर लघुदाब वर्गवारीमध्ये घरगुती- २ लाख ३३ हजार ४२७, वाणिज्यिक- ३८ हजार २४, औद्योगिक- ६६५०, कृषी-३१ हजार ४७५, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना- ३८३ व इतर ४,२०० अशा एकूण ३ लाख १४ हजार १५९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत.

महावितरणने सिंगल व थ्री फेजच्या १९ लाख ७० हजार नवीन वीजमीटरचा पुरवठा करण्याचे कार्यादेश गेल्या फेब्रुवारीमध्ये दिले होते. त्यामुळे नवीन वीजमीटरचा पुरवठा सुरळीत झाला आहे. आतापर्यंत सिंगल फेजचे ८ लाख ६८ हजार आणि थ्री फेजचे ८५ हजार मीटर उपलब्ध झाले असून ते प्रादेशिक कार्यालयांना पाठविण्यात आले आहेत.