शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन घोटाळ्यावर ३१३४ पानांची तक्रार

By admin | Updated: February 27, 2015 02:09 IST

जनमंच या सामाजिक संस्थेतर्फे गुरुवारी विदर्भातील सिंचन प्रकल्पांत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात एकूण १२ खंडांमध्ये ३१३४ पानांची तक्रार

नागपूर : जनमंच या सामाजिक संस्थेतर्फे गुरुवारी विदर्भातील सिंचन प्रकल्पांत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात एकूण १२ खंडांमध्ये ३१३४ पानांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या पोलीस अधीक्षकांसमक्ष सादर करण्यात आली. या पुराव्यांच्या आधारावर पारदर्शी व कठोर चौकशी करून दोषी अधिकारी व कंत्राटदारांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची संस्थेची मागणी आहे.या तक्रारीत एकट्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या निविदेवर केलेल्या अभ्यासाचा लेखाजोखा आहे. प्रकल्पाच्या निविदेची कागदपत्रे मिळवून सखोल पडताळणी केल्यानंतर प्रकल्पात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले. कंत्राटदार व महामंडळाचे अधिकारी यांनी संगनमताने कट रचून हा घोटाळा केला, असा दावा जन मंचने केला आहे. निविदेवर कंत्राटदारांच्या बोलीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या अपेक्षित खर्चामध्ये अवाढव्य वाढ केली. कंत्राटदारांची बोली व प्रकल्पाचा अपेक्षित खर्च यात पाच टक्क्यांपेक्षा जास्त फरक राहू नये यासाठी हा गैरप्रकार करण्यात आला. हा फरक पाच टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास वित्त विभागाची परवानगी घ्यावी लागते. वित्त विभागाचा हस्तक्षेप टाळण्यासाठी व महामंडळाच्या अधिकारक्षेत्राखालीच खर्चाला मंजुरी देण्याकरिता अपेक्षित खर्च वाढविण्यात आला.कंत्राटदारांना बांधकामविषयक किमान निकषांचा पुरेसा अनुभव नव्हता. मूल्यमापन समितीने कंत्राटदारांना लाभ पोहोचविण्यासाठी याकडे दुर्लक्ष केले. तसेच, कंत्राट मिळालेल्या कंत्राटदाराची पुरेशी बोली सादर करण्याची क्षमता नव्हती. त्यांनी सत्य परिस्थिती लपवून महामंडळाची दिशाभूल केली. बोलीच्या प्रक्रियेत काहीच गुणवत्ता नसून तो केवळ एक देखावा होता. सर्व कंत्राटदार एका विशिष्ट कटांतर्गत एकत्र आले होते. त्यांनी स्वत:च्या छुप्या कंपन्यांनाही सहभागी करून घेतले होते. हा घोटाळा फौजदारी कटाचे उदाहरण आहे, याकडे तक्रारीत लक्ष वेधण्यात आले आहे. पुराव्यांमध्ये खोडतोड होण्याची शक्यता पाहता सध्याच्या परिस्थितीत विशिष्ट स्वरुपाची माहिती सादर करता येणार नाही, असेही तक्रारीत स्पष्ट करण्यात असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)