शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात १८ महिन्यात ३१ यकृत प्रत्यारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 00:03 IST

उपराजधानीत गेल्या १८ महिन्यापासून सुरू झालेले यकृत प्रत्यारोपण आपल्या अर्धशतकाकडे वाटचाल करीत आहे. विजयादशमीच्या दिवशी ४३ वर्षीय ब्रेन डेड व्यक्तीने यकृत दान केल्याने प्रत्यारोपणाचा आकडा आता ३१ वर पोहचला आहे.

ठळक मुद्देमध्यभारतात वाढतोय अवयवदानाचा टक्का : पटले कुटुंबीयाच्या पुढाकाराने रुग्णाला जीवनदान

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नातेवाईकांचा संयम आणि मानवतावादी भूमिकेमुळे ‘ब्रेन डेड’ झालेल्या व्यक्तीकडून अवयवदानाचा टक्का वाढत आहे. अनेकांना नवे आयुष्य मिळत आहे. विशेषत: उपराजधानीत गेल्या १८ महिन्यापासून सुरू झालेले यकृत प्रत्यारोपण आपल्या अर्धशतकाकडे वाटचाल करीत आहे. विजयादशमीच्या दिवशी ४३ वर्षीय ब्रेन डेड व्यक्तीने यकृत दान केल्याने प्रत्यारोपणाचा आकडा आता ३१ वर पोहचला आहे.नरेश पटले (४३) रा. तिरखेडी गोंदिया, असे त्या अवयवदात्याचे नाव. प्राप्त माहितीनुसार, पटले यांना ‘ब्रेन हॅमरेज’ झाल्याने त्यांना सुरुवातीला गोंदिया येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने नागपुरातील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. परंतु उपचाराला प्रतिसाद मिळाला नसल्याने ७ ऑक्टोबर रोजी पटले यांचा मेंदू मृत (ब्रेन डेड) झाल्याची माहिती डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबाला दिली. सोबतच अवयवदानाचा सल्लाही दिला. कुटुंबांनी आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेत मूत्रपिंड, यकृत व नेत्रदानासाठी पुढाकार घेतला. ‘झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर’ने (झेडटीसीसी) पुढील प्रक्रिया पूर्ण केली. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी योग्य नव्हते. यकृत न्यू इरा हॉस्पिटलमधील एका रुग्णाला देण्यात आले, तर नेत्र महात्मे नेत्रपेढीला दान करण्यात आले. यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना, डॉ. विजेंद्र किरनाके, डॉ. साहिल बन्सल, डॉ. सुशृत, डॉ. सविता जयस्वाल, डॉ. अश्विनी व डॉ. अमोल कोकास यांनी यशस्वी केली. यांना हॉस्पिटलचे संचालक कार्डीओथॉरेसीक तज्ज्ञ डॉ. आनंद संचेती, न्यूरोसर्जन डॉ. नीलेश अग्रवाल व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. निधीश मिश्रा यांचे मार्गदर्शन लाभले.अवयवदानात नागपूर तिसऱ्या स्थानीडॉ. आनंद संचेती म्हणाले, राज्यात अवयवदानात नागपूर नवव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. नागपुरात अवयवदानाचा प्रयत्न २०१३ पासून सुरू झाला. या सहा वर्षांत ५३ मेंदूमृत व्यक्तीने १४५ अवयवांचे दान केले आहे. यात एकट्या न्यू इरा हॉस्पिटलमध्ये मागील आठ महिन्यात ४० प्रत्यारोपण झाले आहेत. यात २५ यकृत, १४ मूत्रपिंड व १ हृदय प्रत्यारोपणाचा समावेश आहे.

टॅग्स :Organ donationअवयव दानnagpurनागपूर