शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

१४६३ ग्राहकांवर ३०.२८ कोटीचे वीज बिल थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:09 IST

ग्राहक श्रेणी थकबाकी (कोटी रुपयात) घरगुती ...

ग्राहक श्रेणी थकबाकी (कोटी रुपयात)

घरगुती २४७.३५ कोटी

वाणिज्यिक ४९.७९ कोटी

औद्योगिक २८.५ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महावितरणच्या शहर सर्कलमध्ये तबल्ल १४६३ वीज ग्राहक असे आहेत ज्यांच्याकडे एक लाखापेक्षा अधिक रकमेचे वीज बिल थकीत आहे. केवळ याच ग्राहकांचा विचार केला तर त्यांच्यावर एकूण ३० कोटी २८ लाख रुपयाची थकबाकी आहे. या थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी महावितरणने या ग्राहकांवर लक्ष केंद्रित केले आहे. थकीत वीज न भरणाऱ्या ५०० ग्राहकांचे कनेक्शन दररोज कापले जात आहेत.

नागपूर शहर सर्कमध्ये ८१,३८९ ग्राहकांनी एप्रिल २०२० पासून वीज बिल भरणे बंद केले आहे. सर्कलमध्ये एकूण वीज बिलाची थकबाकी १६९.९० कोटी इतकी आहे. यात एक लाख रुपयापेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या ग्राहकांची संख्या १४६३ इतकी आहे. एप्रिल २०२० पासून बिल न भरणाऱ्यांवर १६९.९० कोटीची थकबाकी आहे. परंतु एकूण थकबाकी ३२५.१९ कोटी रुपये आहे. यात एप्रिल २० पूर्वीपासून आणि डिसेंबर २० नंतरची थकबाकीचाही समावेश आहे.

महावितरणनुसार यापैकी बहुतांश ग्राहकांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने कोरोना काळातील वीज बिलापासून दिलासा देण्याची घोषणा केली होती. दिलासा मिळेल या अपेक्षेने बहुतांश ग्राहकांनी वीज बिल भरणेच बंद केले. दुसरीकडे राज्य सरकारने ३१ डिसेंबरपर्यंतच थकबाकीदारांना अभय देण्याचा निर्णय घेतला. आता बिल न भरणाऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहे.

बॉक्स

सर्वाधिक लखपती थकबाकीदार सिव्हील लाईन्समध्ये

शहरात सर्वाधिक लखपती वीज थकबाकीदार सिव्हील लाईन्स डिव्हिजनमध्ये आहेत. येथे ६५२ थकबाकीदार आहेत ज्यांच्यावर १४.३२ कोटी रुपये थकीत आहेत. या श्रेणीत सर्वात कमी १९ ग्राहक एमआयडीसी डिव्हिजन(बुटीबोरी-हिंगणा)मध्ये आहेत. त्यांच्यावर २८.३७ कोटी रुपयाची थकबाकी आहे. त्याचप्रकारे काँग्रेसनगर डिव्हिजनमध्ये ४९ ग्राहकांवर १.१४ कोटी, गांधीबागमध्ये २८० ग्राहकांवर ५.१२ कोटी व महाल येथील ४६३ ग्राहकांवर ९.४० कोटीचे वीज बिल थकीत आहे.

बॉक्स

घरगुती ग्राहक सर्वाधिक

एक लाख व त्यापेक्षा अधिकचे बहुतांश वीज थकबाकीदार घरगुती श्रेणीमधील आहेत. हिंगणा व बुटीबोरीसारख्या औद्योगिक क्षेत्रात अशा ग्राहकांची संख्या केवळ १९ आहे. यातून हे दिसून येते की, कारखान्यांनी आपले वीज बिल थकीत ठेवलेले नाही. दुसरीकडे ज्या डिव्हिजनमध्ये अधिक थकबाकी आहे, तिथे घरगुती कनेक्शनची संख्या अधिक आहे.

.

बॉक्स

मोठ्या थकबाकीदारांवर अगोदर कारवाई

महावितरणची आर्थिक परिस्थिती पाहता थकबाकीदारांकडून वसुली करण्यास प्राधान्य दिले जात आहे. एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम थकीत असलेल्यांचे वीज बिल अगोदर कापले जात आहे. या सर्वांना नोटीस देऊन १५ दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे.

अमित परांजपे, अधीक्षक अभियंता, महावितरण