शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१ मिनिटात फोडल्या ३०० टाईल्स

By admin | Updated: July 17, 2017 02:28 IST

शस्त्राविना आत्मसंरक्षणाचे कौशल्य शिकविणारा खेळ म्हणजे कराटे. ब्रुसली, जेटली यांना पडद्यावर थरारक कराटे करताना पाहून

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शस्त्राविना आत्मसंरक्षणाचे कौशल्य शिकविणारा खेळ म्हणजे कराटे. ब्रुसली, जेटली यांना पडद्यावर थरारक कराटे करताना पाहून प्रत्येकात रोमांच जागा होतो. असाच रोमांच नागपूरच्या कार्तिक अनिल जयस्वाल याने रविवारी निर्माण केला. कराटे पारंगत कार्तिकने १ मिनिटात त्याने ३०० टाईल्स फोडण्याचे थरारक प्रात्यक्षिक करून विक्रमाला गवसणी घातली. रविवारी संत रविदास सांस्कृतिक सभागृह हनुमाननगर येथे कार्तिकच्या थरारक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. दहा- दहा टाईल्सचे ३० कप्पे करण्यात आले होते. सायंकाळी ६ वाजता कार्तिकने आपल्या विक्रमाला सुरुवात केली. त्याचा थरार बघण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. एक-एक करत कार्तिक सहजतेने टाईल्सचे कप्पे फोडत होता. प्रत्येक कप्पा फोडल्यानंतर त्याला उपस्थितांकडून भरभरून प्रोत्साहन मिळत होते. एका मिनिटात त्याने ३० ही कप्पे फोडून इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड आणि एशिया बुक आॅफ रेकॉर्डस् साठी आपले नाव नोंदविले. यावेळी इंडिया बुक आॅफ रेकॉर्डसचे परीक्षक म्हणून डॉ. मनोज तत्त्ववादी उपस्थित होते. एशिया बुक आॅफ रेकॉर्डच्या परीक्षक म्हणून डॉ. सुनिता धोटे त्याचबरोबर विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय कलचुपरी एकता महासंघाचे अध्यक्ष दीपक जयस्वाल, तेजस्विनी विद्यामंदिरचे अध्यक्ष डॉ. वागेश कटारिया व शिकाई असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष मजहर खान उपस्थित होते. कार्तिकने नुकताच दहावीची परीक्षा ८० टक्के उत्तीर्ण केली आहे. त्याने कराटेचे प्रशिक्षण मजहर खान यांच्याकडून घेतले आहे. बालपणापासूनच कराटेचे आकर्षण होते. कराटेच्या बहुतांश परीक्षा उत्तीर्ण झालो आहे. कराटे खेळातच रेकॉर्ड करण्याची मनिषा होती. भरपूर तयारी करावी लागली. हा विक्रम करताना शारीरिक व मानसिक तयारी करावी लागली. प्रशिक्षकांची त्यासाठी भरपूर मदत झाली. वडील अनिल व आई संगीता यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे हा रेकॉर्ड करण्यात यश मिळाल्याचे कार्तिक याने सांगितले.