आॅनलाईन लोकमतनागपूर : कृषी विभागामध्ये एकूण मंजूर पदांपैकी ३० टक्के पदे रिक्त असून याचा आकडा ८ हजार ३६७ इतका आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्यामुळे शेतीसंबंधीची कामे पूर्ण होताना अडचण जाते हे अंशत: खरे असल्याची माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. कृषी विभागातील रिक्त पदांसंदर्भात अॅड.जयदेव गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याच्या लेखी उत्तरात कृषिमंत्र्यांनी ही माहिती दिली.सप्टेंबर २०१७ च्या अखेरीस कृषी विभागात एकूण २७ हजार ५०२ मंजूर पदे होती. यापैकी १९ हजार १३५ पदे भरलेली असून उर्वरित ८ हजार ३६७ पदे रिक्त आहेत. वित्त विभागाच्या निर्णयानुसार आकृतिबंध मंजूर होईपर्यंत नवीन पदभरती करता येणार नाही. मात्र विशेष बाब म्हणून कृषी सहायकांची १ हजार १२५ रिक्त पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे, असेदेखील उत्तरात नमूद करण्यात आले आहे.
कृषी विभागातील ३० टक्के पदे रिक्त; एकूण संख्या ८ हजारांहून अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 18:26 IST
कृषी विभागामध्ये एकूण मंजूर पदांपैकी ३० टक्के पदे रिक्त असून याचा आकडा ८ हजार ३६७ इतका आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्यामुळे शेतीसंबंधीची कामे पूर्ण होताना अडचण जाते हे अंशत: खरे असल्याची माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.
कृषी विभागातील ३० टक्के पदे रिक्त; एकूण संख्या ८ हजारांहून अधिक
ठळक मुद्देकृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांची माहिती