शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

कापसाला हेक्टरी ३० ते ३७ हजारांची मदत; कृषिमंत्र्यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:34 IST

बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी कापसाला हेक्टरी ३० ते ३७ हजार रुपयांची मदत दिली जाईल. सोबतच धानाला हेक्टरी ७ हजार ९७० रुपये ते १४ हजार ६७० रुपये मदत दिली जाईल अशी घोषणा कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी विधानसभेत केली.

ठळक मुद्देधानाला प्रती क्विंटल २०० रुपये बोनस 

आॅनलाईन लोकमतनागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बोंडअळीमुळे झालेले कापसाचे नुकसान, दुष्काळामुळे झालेले धान, फळपीक व भाजीपाल्याचे नुकसान चांगलेच गाजले. शेवटी जाता जाता सरकारने या चारही पिकांसाठी मदत जाहीर केली. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी कापसाला हेक्टरी ३० ते ३७ हजार रुपयांची मदत दिली जाईल. सोबतच धानाला हेक्टरी ७ हजार ९७० रुपये ते १४ हजार ६७० रुपये मदत दिली जाईल. ही मदत दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत राहील. याशिवाय धानाला प्रति क्विंटल २०० रुपये बोनस दिला जाईल, अशी घोषणा कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी विधानसभेत केली.शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे राजकीय भांडवल करण्याची कुठलीही संधी विरोधकांना मिळू नये म्हणून सत्ताधाऱ्यांनीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडला होता. यावरील चर्चेदरम्यान मात्र, विरोधकांनी सरकारच्या कृषी धोरणांवर टीका करीत भरीव मदतीची मागणी लावून धरली होती. शेवटी अधिवेशनाचे सूप वाजताना शेतकऱ्यांच्या पदरात मदतीची घोषणा पडली. कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी सांगितले की, कापसाला दिली जाणारी मदत ही एनडीआरफ (राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक), पीक विमा योजना व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत मिळणारी मदत, असे तिन्ही एकत्रित करून दिली जाईल. कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्याला प्रती हेक्टरी एनडीआरफमधून ६ हजार ८०० रुपये, पीक विमा अंतर्गत ८ हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत १६ हजार रुपये असे एकूण ३० हजार ८०० रुपये मिळतील. बागायती कापूस उत्पादकाला प्रती हेक्टरी एनडीआरफमधून १३ हजार ५०० रुपये, पीक विमा अंतर्गत ८ हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत १६ हजार रुपये असे एकूण ३७ हजार ५०० रुपये मिळतील.कोरडवाहू धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी एनडीआरफमधून ६८०० रुपये व पीक विमा अंतर्गत ११७० रुपये असे एकूण ७ हजार ९७० रुपये मिळतील. ओलिताच्या धान उत्पादकांना प्रती हेक्टरी एनडीआरफमधून १३ हजार ५०० रुपये, पीक विमा अंतर्गत ११७० रुपये असे एकूण १४ हजार ६७० रुपये मिळतील. याशिवाय धानाला प्रति क्विंटल २०० रुपये बोनस दिला जाईल व ही मर्यादा ५० क्विंटलपर्यंत असेल, असेही कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले. फ़ळपीकांसाठी एनडीआरफमधून १८ हजार रुपये व पीक विमा अंतर्गत ९ ते २५ हजार रुपयांची मदत मिळेल. भाजीपाला उत्पादकांना हेक्टरी १३ हजार ५०० रुपयांची मदत मिळणार आहे.अशी मिळणार मदत              (हेक्टरी)पीक                           कोरडवाहू                        बागायतीकापूस                          ३०८००                           ३७५००धान                            ७९७०                              १४६७०फळपीक                      २७०००                            ४३०००भाजीपाला                   १३,५०० (सर्व प्रकारचा)--------------------------------टीप : मदत दोन हेक्टरपर्यंतच मिळेल

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७cottonकापूस