शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सहा महिन्यांत २९६५ अल्पवयीन मुली बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 11:55 IST

अवघ्या सहा महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात दहा-वीस नव्हे तर तब्बल दोन हजार ९६५ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी गृह खात्याच्या अहवालातून पुढे आली आहे.

ठळक मुद्देटोळी सक्रिय असल्याचा संशय देहव्यापार, आखाती देशात नेल्याचा कयास

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अवघ्या सहा महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात दहा-वीस नव्हे तर तब्बल दोन हजार ९६५ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी गृह खात्याच्या अहवालातून पुढे आली आहे. हा आकडा पाहता अपहरण करणाऱ्या टोळ्याच राज्यात सक्रिय असाव्या, असा संशय व्यक्त केला जात आहे.राज्यात रोज कोणत्या ना कोणत्या पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार प्राप्त होते. अनेकदा लग्नाचे आमिष देऊन मुलीला पळविले गेले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न होते. पुढे अशा मुलींचा शोध घेऊन एक तर त्यांना पालकांच्या ताब्यात दिले जाते किंवा सुधारगृहात पाठविले जाते. परंतु अशी प्रकरणे फारच कमी असतात. बहुतांश प्रकरणात अल्पवयीन मुलीचा थांगपत्ताच लागत नाही. मुलींचा शोध घ्यावा म्हणून त्यांचे नातेवाईक पोलीस ठाण्यापासूून महासंचालक कार्यालय व गृह मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार करतात. परंतु ‘शोध सुरू आहे’, एवढेच ठेवणीतील उत्तर मिळते. आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील तर अनेकदा नातेवाईक स्वबळावर शोध घेण्याचाही प्रयत्न करतात. परंतु त्यांना यश येतेच असे नाही.जानेवारी ते जून २०१७ या सहा महिन्यात राज्यात तब्बल दोन हजार ९६५ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. २०१६ मध्ये जानेवारी ते जूनचा हा आकडा दोन हजार ८८१ एवढा होता. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत २०१७ मध्ये अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण ८४ ने वाढले आहे. अशा मुलींना भुलवून पळवून नेणारी टोळी राज्यात सक्रिय असावी, या मुलींचा देहव्यापार, लव्हजिहाद, आखाती देशातील वेश्या व्यवसाय, परप्रांतातील विवाह, घरकामयासाठी वापर केला जात असावा, असा संशय आहे.टोळी सक्रिय असण्याची शक्यता मात्र गृह खात्याकडून फेटाळण्यात आली आहे. अशा घटना टाळण्यासाठी अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्ष, थेट अपहाराचा गुन्हा, स्वतंत्र पथक, प्रबोधन-जनजागृती आदी विविध उपाययोजना व जनजागृती केली जात असल्याचे शासनाकडून सांगितले जाते.परंतु अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याचा वाढता आकडालक्षात घेता या उपाययोजना थिट्या ठरत आहेत.

‘आॅपरेशन’द्वारे शोधाशोधहरविलेल्या बालकांच्या शोधार्थ आॅपरेशन मुस्कान, आॅपरेशन स्माईल राबविले जाते. २०१६ मध्ये या आॅपरेशनमधून हरविलेल्या एक हजार ६१३ तर २०१७ मध्ये ६४५ बालकांचा शोध लावण्यात आला आहे.

टॅग्स :Kidnappingअपहरण