शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

चार वर्षात २८२९ घटस्फोट

By admin | Updated: September 30, 2015 06:24 IST

फेसबुक, व्हॉटस्अप या सोशल नेटवर्किंगच्या स्वैर वापरातून वैवाहिक जीवनाचे बंध तुटत आहेत. अनेकांच्या संसाराचा

नागपूर : फेसबुक, व्हॉटस्अप या सोशल नेटवर्किंगच्या स्वैर वापरातून वैवाहिक जीवनाचे बंध तुटत आहेत. अनेकांच्या संसाराचा प्रारंभ बिंदूच अखेरचा ठरत आहे. संसाराची नाव पैलतीरावर पोहोचण्यापूर्वी तडे जात आहेत. पती-पत्नीच्या एकत्र सहमतीने दररोज सरासरी तीन जोडप्यांचे विवाहसंबंध विच्छेदित होत आहे. या भयावह स्थितीने विवाहसंस्थाच आता धोक्यात आली आहे. १ जानेवारी २०१२ ते ३१ आॅगस्ट २०१५ या कालावधीत नागपूर येथील कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी ३२९० प्रकरणे दाखल झाली होती. यापैकी २८२९ प्रकरणांत न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला आहे. अभय कोलारकर यांना माहितीच्या अधिकारांतर्गत देण्यात आलेल्या माहितीतून ही बाब पुढे आली आहे. वर्षनिहाय आकडेवारीनुसार, २०१२ मध्ये ७९४, २०१३ मध्ये ८८९, २०१४ मध्ये ९२९ तर, १ जानेवारी ते ३१ आॅगस्ट २०१५ पर्यंत ६७८ प्रकरणे घटस्फोटासाठी दाखल झाली होती. या काळात अनुक्रमे ८०९, ७८८, ७७८ व ४५४ प्रकरणात घटस्फोट मंजूर झाले. (प्रतिनिधी)अशी आहे अन्य आकडेवारी४संबंधित काळात आपसी सहमतीने घटस्फोट मिळण्यासाठी १८२८, स्त्रीधनासाठी २२७, पोटगीसाठी ३६४ तर, मुलांच्या ताब्यासाठी २३५ दावे दाखल झाले होते. ३१ आॅगस्टपर्यंत एकूण ७२६१ प्रकरणे प्रलंबित होते. यात ५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ४८ तर, १० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ३ प्रकरणांचा समावेश आहे. एकूण प्रकरणांपैकी २३४३ प्रकरणांत पोटगी व स्त्रीधन मंजूर झाले.समुपदेशनाचा लाभयोग्य समुपदेशन व इतर कारणांमुळे अनेक दाम्पत्यांचे विवाहबंधन कायम राहिले. २०१२ मध्ये २११, २०१३ मध्ये २६७, २०१४ मध्ये २२२ तर, १ जानेवारी ते ३१ आॅगस्ट २०१५ या कालावधीत १६९ प्रकरणांत घटस्फोट टळले. याप्रकरणातील दाम्पत्यांची मने जवळजवळ दुरावली होती. ते एकमेकांसोबत राहण्यास तयार नव्हते. एकत्र बसवून वाद मिटविल्यामुळे घटस्फोटाचा विचार मागे पडला.