शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात २,६६१ लसीकरण केंद्र स्थापन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनावरील लस डिसेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होईल. जिल्ह्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनावरील लस डिसेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होईल. जिल्ह्यात एकूण २ हजार ६६१ ठिकाणी लसीकरण केंद्र स्थापन करण्यात येईल. त्यामध्ये महानगरपालिका हद्दीत ९०२ तर ग्रामीण भागात १ हजार ७५९ लसीकरण केंद्र स्थापन करण्यात येतील. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे कोरोना विषाणू लसीकरणाबाबत करावयाच्या नियोजनासंदर्भात जिल्हा टास्क फोर्सची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ही माहिती सादर करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उप जिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामचे अश्विनी नागर, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. महम्मद साजीद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक थेटे, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉ. अर्चना कोठारी उपस्थित होते. लसीकरणासाठी जिल्ह्यामध्ये एकूण ५९७ लस टोचणाऱ्या ‘नर्सिंग स्टाफ’ची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये महानगरपालिकेकडील २०९ तर ग्रामीण भागातील आरोग्य विभागातील ३८८ परिचारिकांचा समावेश आहे. लस टोचणाऱ्या व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी केल्या जाईल. तसेच लसीकरण केलेल्या व्यक्तीला अर्धा तास लसीकरण केंद्रावर थांबविण्यात येईल. लसींच्या साठ्यांसाठी सर्व केंद्रांवर शीत कपाटे उपलब्ध राहतील, अशी माहिती अश्विनी नागर यांनी दिली.

वैद्यकीय क्षेत्राला लसीकरणात प्राधान्य

वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, नर्सेस तसेच जोखमीच्या रूग्णांना प्राधान्यक्रमाने लसीकरण करण्यात येईल. प्रत्येक कोरोना योद्ध्याला देखील लसीकरण करण्यात येईल. यासाठी आरोग्य विभागाने सर्व स्तरावर सूक्ष्म नियोजन करावे. महानगरपालिका क्षेत्र तसेच पंचायत समितीअंतर्गत रुग्णालयांनी त्यांच्याकडील डॉक्टर्स तसेच परिचारिका यांची लसीकरणासाठी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी. अ‍ॅलोपॅथीप्रमाणेच आयुर्वेदिक आणि होमियोपॅथी उपचार करणाऱ्या डॉक्टर्स तसेच परिचारिकांचा यात समावेश करण्यात येणार आहे. कोरोनावरील लसीकरण म्हणजे पूर्णत: सुरक्षा नसून नंतरच्या कालावधीतही काळजी घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.