शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या मुलीला एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो असे सांगून  २६.५२ लाखांनी गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2022 20:16 IST

Nagpur News मुंबईतील सेठ जीएस मेडिकल कॉलेज अँड केम हॉस्पिटल परेल येथे एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो असे सांगून तीन आरोपींनी २६.५२ लाखांनी गंडविल्याची घटना अजनी पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे.

ठळक मुद्देमुंबईतील जीएस मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशाचे आमिष

नागपूर : मुंबईतील सेठ जीएस मेडिकल कॉलेज अँड केम हॉस्पिटल परेल येथे एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो असे सांगून तीन आरोपींनी २६.५२ लाखांनी गंडविल्याची घटना अजनी पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मयंक अग्रवाल, कामरान खान, राकेश पाटील आणि आशिष जैस्वाल (सर्व रा. मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मधुबन अपार्टमेंट, सेंट्रल रेल्वे कॉलनी ओमकारनगर येथील रहिवासी गोपाल हरीशचंद्र पराते (वय ५९) यांची मुलगी मोनिका नीटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे तिला एमबीबीएसला प्रवेश घ्यायचा होता. दरम्यान, आरोपी कामरान खान याने पराते यांच्या मोबाईलवर कॉल करून बंगळूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो असे सांगितले. परंतु, पराते यांना महाराष्ट्रात प्रवेश पाहिजे असल्याने आरोपीने मुंबईतील सेठ जीएस मेडिकल कॉले अँड केम हॉस्पिटल परेल येथे प्रवेश मिळवून देतो असे सांगून त्यांना मुंबईला भेटीसाठी बोलावले.

तेथे कामरान खान याने आरोपी राकेश पाटील सोबत भेटण्यास सांगितले. राकेशने १ लाख १२ हजार ६१५ रुपयांचा डिमांड ड्राफ्ट कॉलेजच्या नावे मागितला. डीडी घेऊन पराते पुन्हा मुंबईला गेले असता आरोपी कामरानने मयंक अग्रवालला डीडी देण्यास सांगितले. पराते यांनी अग्रवालला डीडी दिला तेव्हा आरोपी राकेश पाटील तेथे हजर होता. नागपूरला आल्यानंतर पराते यांनी डीडीच्या पावतीबाबत विचारले असता मयंकने २५ लाख डोनेशन दिल्याशिवाय प्रवेश होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे पराते यांनी १५ लाखांची जुळवाजुळव केली.

आरोपी मयंक अग्रवाल आणि राकेश पाटील यांनी पराते यांच्या घरी येऊन १५ लाख घेतले. त्यानंतर पराते यांना व्हॉट्सअपवर डीडी मिळाल्याची पावती पाठविली. पराते यांनी अलॉटमेंट लेटरबाबत विचारले असता त्यांनी आणखी १० लाख रुपये घेऊन मुंबईला येण्यास सांगितले. पराते मुंबईला येणे जमत नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपी कामरानने त्यांना आशिष जयस्वाल यांचे एस. बँक दिल्लीतील अकाऊंट नंबर पाठविला. पराते यांनी या अकाऊंटमध्ये आरटीजीएसने १० लाख पाठविले.

त्यानंतर आरोपींनी मुलीच्या ई मेलवर प्रोव्हिजनल ॲडमिशन लेटर पाठविले. पराते हे मुंबईला गेले असता त्यांना आरोपी भेटले नाहीत. त्यानंतर त्यांनी कॉलेजच्या डीनची भेट घेतली असता त्यांनी कागदपत्र तपासून ते बोगस लेटर असल्याचे सांगितले. याबाबत पराते यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

.............

टॅग्स :fraudधोकेबाजी