शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत २५ दिवसात २६ विना हेल्मेट दुचाकीस्वारांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 10:28 IST

मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये गेल्या २५ दिवसांमध्ये अपघातात गंभीर १०४ जखमींपैकी ९० टक्के दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले नव्हते. परिणामी, २६ जखमींना आपल्या प्राणाला मुकावे लागल्याचे आढळून आले.

ठळक मुद्दे‘ट्रॉमा केअर सेंटर’मधील जखमींचा अभ्यास२५ दिवसातील धक्कादायक स्थिती१०४ जखमींपैकी ९० टक्के दुचाकीस्वाराच्या मेंदूला मार

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करण्याचा शासनस्तरावर प्रयत्न होत आहे. वाहतूक पोलीस विभागाकडूनही मोठ्या प्रमाणात कारवाई होत आहे, असे असतानादेखील बहुसंख्य दुचाकीचालकांना हेल्मेट हे ओझे वाटते. परिणामी, अपघात झाल्यास मेंदूला जबर मार बसून जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये गेल्या २५ दिवसांमध्ये अपघातात गंभीर जखमी रुग्णांचा डॉक्टरांनी अभ्यास केला असता, १०४ जखमींपैकी ९० टक्के दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले नव्हते. परिणामी, त्यांच्या मेंदूला जबर मार बसून २६ जखमींना आपल्या प्राणाला मुकावे लागल्याचे आढळून आले.भारतात रस्ता अपघातातील मृत्यूची संख्या ही कुठल्याही आजाराच्या तुलनेत सर्वाधिक आहे. म्हणूनच अपघातातील जखमींना पहिल्या तासात (गोल्डन अवर) तातडीने वैद्यकीय सेवा मिळून त्यांना जीवनदान मिळण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) ‘ट्रॉमा केअर सेंटर’ सुरू केले. या सेंटरमध्ये गेल्या दोन वर्षांत ‘न्यूरोसर्जरी’ म्हणजे मेंदूवरील शस्त्रक्रियेसह, अस्थिव्यंग, सामान्य, दंत व ‘प्लास्टिक सर्जरी’चे प्रमाण वाढले आहे. २४ तास तज्ज्ञ डॉक्टरांची चमू येथे कार्यरत असल्याने जखमींचा जीव वाचत आहे. हे ‘सेंटर’ अनेकांसाठी वरदान ठरत आहे. परंतु मृत्यूचा दरही २६ टक्के आहे. या मागील कारणांचा शोध घेण्यासाठी ‘ट्रॉमा केअर सेंटर’चे आर्थाेपेडिक सर्जन डॉ. मोहम्मद फैजल यांनी पुढाकार घेऊन आलेल्या जखमींची माहिती घेणे सुरू केले. प्राथमिक स्तरावर त्यांना मिळालेली माहिती ही थक्क करणारी आहे. आॅगस्ट महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजे २५ दिवसांपासून संकलित करण्यात आलेल्या या माहितीच्या आधारे ‘ट्रॉमा केअर सेंटर’मध्ये १०४ गंभीर जखमी उपचारासाठी दाखल झाले. यातील ९० टक्के जखमींनी हेल्मेट घातलेले नव्हते. यातील २६ जखमींच्या मेंदूला जबर मार बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. इतर जखमींमध्ये काही बरे झाले असलेतरी काही रुग्णांना अपंगत्व, तर काहींवर कायमचे खाटेवर पडून राहण्याची वेळ आली आहे.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा