शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

२५८ स्कूल बस चालकांना परवाना रद्दची नोटीस

By admin | Updated: June 24, 2016 03:06 IST

अपघाताच्या घटना व तांत्रिक बिघाड टाळून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी स्कूल बसेसची फेरतपासणी करण्याचे आदेश परिवहन विभागाने काढले.

आरटीओ : बस, व्हॅन चालकांचे दणाणले धाबेनागपूर : अपघाताच्या घटना व तांत्रिक बिघाड टाळून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी स्कूल बसेसची फेरतपासणी करण्याचे आदेश परिवहन विभागाने काढले. परंतु प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) वचक नसल्याने की काय मुदतवाढ देऊनही १५०० मधून ५० टक्केही स्कूल बस व व्हॅन चालक तपासणीसाठी आलेच नाहीत. याला गंभीरतेने घेत शहर आरटीओने गुरुवारपर्यंत १५८ तर पूर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने १०० वाहनांना तुमचा परवाना रद्द का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावली आहे. या नोटीसमुळे बस व व्हॅन चालकांचे धाबे दणाणले आहे.न्यायालयाचा आदेश व परिवहन विभागाच्या सूचनेनुसार शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी दरवर्षी करणे बंधनकारक केले आहे़ उन्हाळी सुट्यांच्या कालावधीत फेरतपासणी करण्याबाबत परिवहन विभागाने २७ एप्रिल रोजी परिपत्रक काढले. त्यानुसार प्रत्येक आरटीओ व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात १ मे ते ५ जून या कालावधीत ही तपासणी बंधनकारक करण्यात आली. तपासणीसाठी कोणतेही शुल्क न घेता निरीक्षकाद्वारे वाहनांची तपासणी केली जाणार होती. यात वाहनाचा रंग, स्कूल बसवर नावाची नोंद, शाळेचे नाव, बसच्या पायरीची नेमून दिलेली उंची या शिवाय धोक्याचे इशारे देणारी प्रकाश योजना, वेग नियंत्रक, दरवाजा उघडण्यासाठी हँडल, आपात्कालीन दरवाजा, चालकास आपात्कालीन परिस्थितीची माहिती होण्याकरिता सूचना मिळण्याची सोय अशा एकूण १५ ते २० नियमांची पूर्तता करणाऱ्या बसला फिटनेस प्रमाणपत्र दिले जाणार होते. परंतु एक महिन्याचा कालावधी देऊनही अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.शहरात एकूण १५०५ स्कूल बस व व्हॅनची नोंद आहे. यातील शहर आरटीओ कार्यालयांतर्गत ५९९ तर पूर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गंत ९०६ बस व व्हॅन येतात. मात्र, परिवहन विभागाच्या आदेशानंतरही यातील ५० टक्केही वाहन चालकांनी आपल्या वाहनाची तपासणी केली नाही. अखेर याची गंभीर दखल घेत गुरुवारपर्यंत शहर आरटीओने १५८ तर पूर्व आरटीओने १०० स्कूल बस व व्हॅन चालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली. सात दिवसानंतर त्यांचे उत्तर ऐकून घेतल्यावर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. परंतु नोटीस प्रकरणामुळे दोन्ही वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)