शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महानगर क्षेत्रात २५ हजार घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:48 IST

प्रधानमंत्री आवास योजनेतून नागपूर महानगर प्राधिकरण क्षेत्रात १० हजार परवडणारी घरे बांधण्यात येत आहेत.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश : महानगर विकास प्राधिकरणाची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रधानमंत्री आवास योजनेतून नागपूर महानगर प्राधिकरण क्षेत्रात १० हजार परवडणारी घरे बांधण्यात येत आहेत. या योजनेतून आणखी २५ हजार घरांचा प्रस्ताव दोन महिन्यात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे मंत्रालयात आयोजित बैठकीत महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या तसेच भविष्यात राबविण्यात येणाºया विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी नागपूर महानगर प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे तसेच त्यांनी जनहितार्थ तयार केलेल्या जाहिराती तसेच पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.महानगर प्राधिकरणातर्फे राबविण्यात येत असलेल्या तीर्थक्षेत्र विकासांतर्गत श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानमधील कामे, विभागीय क्रीडा संकु ल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तूंचे जतन व संग्रहालयाचे आधुनिकीकरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कव्हेन्शन सेंटर, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गतउभारण्यात येणारी घरे, चिखली (देव) येथील आदिवासी मुलांचे वसतिगृह, मोठा ताजबाग येथील दर्गा परिसराचा विकास आराखडा, दीक्षाभूमी स्तुपाचे नूतनीकरण, बुद्धिस्ट सर्किटअंतर्गत दीक्षाभूमी-नागपूर, शांतिवन-चिंचोली व ड्रॅगन पॅलेस या स्थळांचा विकास, सी प्लेन, कोराडी तलाव संवर्धन आदी प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. नागपूर सुधार प्रन्यासतर्फे सुरू असलेले तसेच प्रस्तावित विकास कामे प्राधिकरणामार्फत सुरू ठेवा तसेच प्राधिकरणातील कामासाठी माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. बैठकीत प्राधिकरणाच्या विविध प्रशासकीय बाबींवर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, समीर मेघे, डॉ. मिलिंद माने, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, प्राधिकरणाचे महानगर आयुक्त दीपक म्हैसेकर, महानगरपालिका आयुक्त अश्विन मुदगल, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी बलकवडे आदी उपस्थित होते.ग्राफिक विकास आराखडा तयार करणारनागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रात विकास नियंत्रण नियमावली सर्वसामान्य लोकांना समजावी, यासाठी या नियमावलीमध्ये रेखाचित्र दर्शविण्यात येणार आहे. यासाठी नागपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्ट यांनी ग्राफिक डीसीआर तयार करून देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार ग्राफिक विकास आराखडा तयार कररण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. विकास नियंत्रक आराखड्यात पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात येत आहे.