शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपा ‘परिवहन’चा २४४.८२ कोटींचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 22:49 IST

महापालिकेच्या ‘आपली बस’मधून शहीद जवानांच्या कुटुंबातील वीर महिलांना मोफत प्रवास तर ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना प्रवास सवलत दिली जाणार आहे. पुढील वर्षात नवीन बस डेपोंची उभारणी, इलेक्ट्रीक व बायोगॅस बसेससह विविध योजनांचा समावेश असलेला परिवहन समितीचा २०१८-१९ या वर्षाचा २४४.८२ कोटी उत्पन्न व २४४.५७ कोटी खर्च अपेक्षित असलेला अर्थसंकल्प सभापती बंटी कुकडे यांनी गुरुवारी स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांना सादर केला.

ठळक मुद्देवीर माता, भगिनींसाठी मोफत प्रवास : गतवर्षीच्या आठ संकल्पांची पूर्तता केल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या ‘आपली बस’मधून शहीद जवानांच्या कुटुंबातील वीर महिलांना मोफत प्रवास तर ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना प्रवास सवलत दिली जाणार आहे. पुढील वर्षात नवीन बस डेपोंची उभारणी, इलेक्ट्रीक व बायोगॅस बसेससह विविध योजनांचा समावेश असलेला परिवहन समितीचा २०१८-१९ या वर्षाचा २४४.८२ कोटी उत्पन्न व २४४.५७ कोटी खर्च अपेक्षित असलेला अर्थसंकल्प सभापती बंटी कुकडे यांनी गुरुवारी स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांना सादर केला.अर्थसंकल्पात २५.०३ लाख शिल्लक गृहीत धरण्यात आली आहे. प्रत्यक्षात गेल्या वर्षभरात परिवहन विभागाला बस तिकीटातून ६१ कोटी २२ लाख ८७ हजारांचा महसूल प्राप्त झाला. शासनाकडून अपेक्षित १०८ कोटींचे अनुदान व महापालिकेकडून इस्त्रो खात्यासाठी अपेक्षित ६० कोटी मिळालेले नाही. म्हणजेच विभागाचे प्रत्यक्ष उत्पन्न ६१.२२ कोटी असून खर्च १२७.६८ कोटी आहे. पुढील वर्षात ही रक्कम मिळण्याची आशा आहे. अर्थसंकल्पात नमूद केल्यानुसार चालू आर्थिक वर्षात इथेनॉल इंधनावर संचालित ५५ ग्रीन बस, तीनही डिझेल बस आॅपरेटरच्या माध्यमातून २३६ डिझेल बस, १५० मिडी बस तसेच महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार महिलांसाठी स्वतंत्र तेजस्वीन मिडी बसेस संचालित करण्याचा महापालिकेचा मानस आहे. पर्यावरणपूरकधोरणानुसार २५ बायोगॅस बसेस, ७० इलेक्ट्रिक बसेस अशा एकूण ५३६ बस ‘आपली बस’ च्या ताफ्यात दाखल होत आहे.शहिदांच्या कुटुंबातील वीर महिलांना मोफत प्रवासपरिवहन विभागातर्फे मॉ जिजाऊ मोफत प्रवास सवलत योजनेंतर्गत देशासाठी कर्तव्यावर तैनात असताना शहीद झालेल्या तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागातील शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबातील शहीदांच्या वीर माता, वीर भगिनी आणि वीर कन्या यांना ‘तेजस्विनी बस ’ तथा सर्वच शहर बस सेवेतील बसमध्ये मोफत बस पास उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. यासाठी १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.बसथांब्यालगत वॉटर एटीएमबसथांब्यालगत वॉटर एटीएमची निर्मिती करण्यात येणार असून, त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन, सौर ऊर्जेद्वारे विद्युत निर्मिती करून इलेक्ट्रिक बस चार्ज करण्यासाठी त्याचा उपयोग यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.अपंगांसाठी व्हीलचेअरसमाजकल्याण विभागातर्फे प्रमुख बसस्थानकावर व्हीलचेअरची उपलब्धता, बसस्थानकावर वेळापत्रक लावणे, जाहिरात कंत्राट देऊन उत्पन्न स्रोत वाढविणे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. ज्या थांब्यावर शेड नाही अशा ६०० थांब्यावर नावीन्यपूर्ण फलकाची निर्मिती करून थांब्यावरील बस पार्किंगची जागा राखीव करण्याकरिता नावीन्यपूर्ण रंगसंगतीचे पेंटिंग करण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.डेपोसाठी नवीन जागासध्या डिझेल बस आॅपरेटर्सकरिता असलेल्या डेपोव्यतिरिक्त शहराच्या पूर्व भागात वाठोडा येथे मनपाच्या १०.८० एकर जागेवर डिझेल बसडेपोकरिता जागा विकसित करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. ग्रीन बस आॅपरेटरकरिता वाडी नाका येथे डेपोकरिता जागा विकसित करून देण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. खापरी नाका येथे इथेनॉल पंप उभारणी करण्यात आली आहे.आठ संकल्पांची पूर्तीमागील वर्षी दहा संकल्प समितीने निश्चित केले होते. त्यातील आठ संकल्प पूर्णत्वास आल्याचा दावा बंटी कुकडे यांनी केला आहे. मागणीनुसार ६५ नवीन मार्गावर नव्याने बसफेऱ्याची सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात सवलत देण्यात आली. ज्या दोन संकल्पाची पूर्ती अद्याप झालेली नाही त्यामध्ये बसथांब्यालगत उपाहारगृहाची निर्मिती करणे, त्यासाठी बेरोजगार युवकांना काळजीवाहक म्हणून नेमणे आणि बसथांब्याची स्वच्छता, निगा व सुरक्षिततेची जबाबदारी त्यांच्यावर सोपविणे आणि सार्वजनिक व खासगी सहभागातून टर्मिनल विकसित करणे याचा समावेश आहे.१३,८८८ तक्रारींचा निपटाराप्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी व तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी समितीतर्फे ०७१२-२२७७९०९९ हा टोल फ्री व ७५००००४६५ हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जाहीर करण्यात आला होता. टोल फ्री क्रमांकावर १४४७६ सूचना व तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १३,८८८ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. व्हॉटस्अ‍ॅपवर एकूण ७७६ सूचना व तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ६८६ चा निपटारा करण्यात आला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प