शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीच्या वर्षात बँकांमध्ये २३ हजार कोटींचे घोटाळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 21:25 IST

माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘आरबीआय’कडे विचारणा केली होती

ठळक मुद्देनोटाबंदीच्या वर्षात देशातील बँकांमध्ये २३ हजार कोटींहून अधिकचे घोटाळे उघडकीस‘आरबीआय’ची आकडेवारी : ४८० कर्मचारी निलंबित

नागपूर, दि. 19 - २०१६-१७ हे आर्थिक वर्ष नोटाबंदीसाठी बरेच गाजले. या वर्षात देशातील विविध बँकांमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. ‘आरबीआय’च्या (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) अधिकृत आकडेवारीनुसार नोटाबंदीच्या वर्षात देशातील बँकांमध्ये २३ हजार कोटींहून अधिकचे घोटाळे उघडकीस आले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘आरबीआय’कडे विचारणा केली होती. २०१६-१७ या आर्थिक वर्षात बँकांमध्ये किती आर्थिक घोटाळे झाले, याअंतर्गत किती कर्मचा-यांवर कारवाई झाली, नोटाबंदीनंतर बँकांमध्ये ५०० व १००० च्या किती नोटा जमा झाल्या इत्यादीसंदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. ‘आरबीआय’कडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत देशातील बँकांमध्ये १ लाख किंवा त्याहून अधिक रकमेचे ५ हजार ७७ घोटाळे उघडकीस आले. यात राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकामध्ये झालेले प्रत्यक्ष घोटाळे किंवा आर्थिक फसवणूक यांचा समावेश होता. या प्रकरणांमध्ये २३ हजार ९३३ कोटी ९१ लाख रुपयांच्या रकमेचा समावेश होता. घोटाळे व फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये विविध बँकांनी आतापर्यंत ४८० कर्मचारी-अधिकाºयांना निलंबित केले आहे. अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकांकडील आकडेवारी अद्यापही ‘आरबीआय’कडे आलेली नाही. 

५००-१००० च्या जमा नोटांची माहितीच नाही दरम्यान, नोटाबंदीपासून देशातील विविध बँकांमध्ये नेमकी किती रक्कम जमा झाली याची माहितीच ‘आरबीआय’कडे उपलब्ध नाही हेदेखील माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. नोटाबंदी लागू झाल्यापासून बँकांमध्ये ५०० व १००० रुपयांच्या नेमक्या किती नोटा जमा झाल्या, यातील किती नोटा बनावट होत्या, हे सांगणे शक्य नाही. सद्यस्थितीत मोजणीचे काम सुरू आहे, असे उत्तर ‘आरबीआय’कडून देण्यात आले आहे.