शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

२३ कंपन्यांकडे अडकले २०९ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘मिहान-सेझ’ व ‘नॉन-सेझ’ भागात आतापर्यंत ११९ कंपन्यांना जमीन विकण्यात आली आहे. मात्र त्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘मिहान-सेझ’ व ‘नॉन-सेझ’ भागात आतापर्यंत ११९ कंपन्यांना जमीन विकण्यात आली आहे. मात्र त्यातील सुमारे १९ टक्के म्हणजेच २३ कंपन्यांनी अद्यापही पूर्ण रक्कम दिलेली नाही. त्यांच्याकडे एकूण २०९ कोटींची रक्कम अडकली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘एमएडीसी’कडे विचारणा केली होती. ‘मिहान-सेझ’मध्ये किती कंपन्यांनी काम सुरू केले आहे, ज्यांना जागेचे वाटप झाले आहे, मात्र काम सुरू झालेले नाही अशा कंपन्यांवर काय कारवाई झाली तसेच ‘एमएडीसी’मध्ये किती रिक्त जागा आहेत, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार ‘मिहान-सेझ’ व ‘नॉन-सेझ’ भागात ११९ कंपन्यांना जमीन विकण्यात आली व त्यातून ९२५.१८ कोटींची रक्कम प्राप्त झाली. मात्र ‘सेझ’मधील १७ व ‘नॉन-सेझ’मधील ६ कंपन्यांनी अनुक्रमे १७५.४४ कोटी व ३३.५६ कोटींची रक्कम थकविली आहे.

सद्य:स्थितीत ‘मिहान’मध्ये ‘सेझ’ व ‘नॉन-सेझ’ मिळून ३२ कंपन्या कार्यरत आहेत. याशिवाय २० नव्या कंपन्यांनी जागा मिळावी यासाठी अर्ज केला आहे.

१५ कंपन्यांना बजावली नोटीस

जमीनवाटप होऊनदेखील अनेक कंपन्यांनी काम सुरू केले नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात ‘एमएडीसी’तर्फे (महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी) १५ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. यापैकी १२ कंपन्या ‘मिहान-सेझ’मधील असून उर्वरित तीन कंपन्या ‘नॉन-सेझ’मधील आहेत.

‘पतंजली’चे काम ९० टक्के पूर्ण

‘पतंजली’ समूहाला जमीन देण्यावरून बराच वाद झाला होता. ‘पतंजली’च्या प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. ५०० कोटींच्या गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा उभारली असून खेळते भांडवल उभारण्याचे काम बँकेकडे अखेरच्या टप्प्यात आहे.