शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार नागरिकांची एकाच वेळी योग साधना

By admin | Updated: June 20, 2017 02:10 IST

विश्व योगदिनानिमित्त महापालिके तर्फे योगाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या विविध १२ संस्थांच्या सहकार्याने धंतोली येथील यशवंत स्टेडियमवर २१ जूनला बुधवारी सकाळी ५.४५ वाजता कार्यक्रमाचे आयोजन....

विश्व योगदिनाची तयारी : मनपाला १२ संस्थांचे सहकार्यलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विश्व योगदिनानिमित्त महापालिके तर्फे योगाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या विविध १२ संस्थांच्या सहकार्याने धंतोली येथील यशवंत स्टेडियमवर २१ जूनला बुधवारी सकाळी ५.४५ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात नागपूर शहरातील २० हजार नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. सकाळी ६.१५ ते ८.१५ असे दोन तास कार्यक्रम होईल. यात एक तास योग करण्यात येतील. पावसाची शक्यता असल्याने उभ्याने शक्य असलेल्या योगाचा समावेश करण्यात आला आहे. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी तर विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. शहरातील सर्व आमदार, खासदार व नगरसेवकांना निमंत्रित करण्यात आले आहे. योगप्रेमींनी कार्यक्रमाला शुभ्र रंगाचे कपडे परिधान करून सहभागी व्हावे, असे आवाहन नंदा जिचकार यांनी केले. पतंजली या कार्यक्रमात सहभागी होणार नाही. त्यांची योग साधना वेगळी असल्याने त्यानुसार स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमात जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, आर्ट आॅफ लिव्हिंग, गायत्री परिवार, मैत्री परिवार संस्था, क्रीडा भारती, ब्रह्मकुमारीज, नागपूर जिल्हा योग संघटना, रामकृष्ण मिशन, श्रीयोग साधना केंद्र, सहजयोग ध्यान केंद्र, एन.सी.सी. जिल्हा क्रीडा असोसिएशन व ईशा फाऊंडेशन आदी संस्थांचा सहभाग राहणार आहे. पत्रपरिषदेला उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्षनेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके,आयुक्त अश्विन मुद्गल, सभापती अविनाश ठाकरे, नागेश सहारे, दिलीप दिवे आदी उपस्थित होते.नागरिकांसाठी बस सुविधायोगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. नागरिकांना सशुल्क या सेवेचा लाभ घेता येईल. पन्नासे ले-आऊ ट ते बर्डी, जयताळा-बर्डी, बेलतरोडी ते बर्डी, सोमलवाडा शाळा, टेलिकॉम नगर, प्रतापनगर, माधवनगर-बर्डी, जयप्रकाश नगर ते बर्डीमार्गे खामला, छत्रपती चौक, सोनेगाव, बर्डी, जरीपटका ते बर्डी, पारडी ते बर्डी, गांधीबाग उद्यान ते बर्डी, दिघोरी ते बर्डी, रमणा मारोती ते बर्डी, काटोल नाका ते साई मंदिर आदी मार्गावर ही सुविधा राहील.