शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइंला हव्या २० जागा

By admin | Updated: July 30, 2014 01:12 IST

महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीत रिपाइंने ५७ जागांची यादी दिली होती. यातील ३०-३५ जागा मिळाव्या असा आग्रह होता. परंतु त्यानुसार जागा मिळण्याची शक्यता नसल्याने किमान २० जागा मिळाव्या

रामदास आठवले : विदर्भातील १३ जागांचा समावेशनागपूर : महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीत रिपाइंने ५७ जागांची यादी दिली होती. यातील ३०-३५ जागा मिळाव्या असा आग्रह होता. परंतु त्यानुसार जागा मिळण्याची शक्यता नसल्याने किमान २० जागा मिळाव्या, अशी मागणी रिपाइंचे नेते खासदार रामदास आठवले यांनी मंगळवारी रविभवन येथे पत्रपरिषदेत केली.विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने जागा वाटपाचा निर्णय तातडीने घ्यावा. पडणाऱ्या जागा न देता निवडून येतील अशाच जागा आम्हाला द्याव्या. विदर्भातील १३ जागांवर रिपाइंने दावा केला आहे. यात उत्तर नागपूर, राजुरा, चिमूर, वर्धा, मोर्शी, अर्जुनी मोरगाव, तिवसा, बडनेरा, उमरखेड, राळेगाव, बाळापूर, मेहकर व वाशिम आदी जागांचा समावेश आहे. आम्हाला डावलले तर महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार नाही. रिसोड मतदारसंघातील पोटनिवडणुकीतून त्यांनी बोध घ्यावा, असा इशारा आठवले यांनी दिला.लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होईल. भाजपवर जातीयवादी असल्याचा आरोप करणारी काँग्रेसच जातीयवादी असल्याचे आठवले म्हणाले. विदर्भातील वन विभागाच्या झुडपी जंगलाच्या जमिनीचे वाटप भूमिहीन दलित व आदिवासींना करण्यात यावे. धनगर समाजाला मराठा व मुस्लीम समाजाच्या धर्तीवर लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण द्यावे, अशी भूमिका आठवले यांनी मांडली. यावेळी अ.भा.धम्मसेनेचे रवी शेंडे यांनी रिपाइंमध्ये प्रवेश घेतला. पत्रपरिषदेला भूपेश थूलकर, अनिल गोंडाणे, राजू बहादुरे, मनोज मेश्राम, दीपक बन्सोड, विकास गणवीर, एल.के.मडावी, राजन वाघमारे आदी उपस्थित होते. कर्नाटक सरकार बरखास्त करावेसीमा भागातील मराठी बांधवांना पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली. हा प्रकार दुर्दैवी आहे. मराठी व कन्नड वाद वाढविण्याचा प्रयत्न होत असल्याने कर्नाटक सरकार बरखास्त करावे, अशी मागणी आठवले यांनी केली. (प्रतिनिधी)