शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
Daily Top 2Weekly Top 5

अंबाझरी तलाव परिसरातून काढला प्लास्टिकचा २० बॅग कचरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 21:44 IST

गेल्या काही वर्षांपासून अगदी व्रत स्वीकारल्यासारखे आय क्लीन नागपूरचे स्वयंसेवक दर रविवारी शहरातील एका ठिकाणाला नवे रूप देण्याच्या प्रयत्नात लागले आहेत. या रविवारी त्यांनी अंबाझरी तलावाकडे मोर्चा वळविला आणि तलावाच्या परिसरातून नाही नाही म्हणत तब्बल २० बॅग प्लास्टिकचा कचरा गोळा केला.

ठळक मुद्दे‘आय क्लीन नागपूर’चा स्तुत्य उपक्रम : आतापर्यंत १५८ ठिकाणी सौंदर्यीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही वर्षांपासून अगदी व्रत स्वीकारल्यासारखे आय क्लीन नागपूरचे स्वयंसेवक दर रविवारी शहरातील एका ठिकाणाला नवे रूप देण्याच्या प्रयत्नात लागले आहेत. या रविवारी त्यांनी अंबाझरी तलावाकडे मोर्चा वळविला आणि तलावाच्या परिसरातून नाही नाही म्हणत तब्बल २० बॅग प्लास्टिकचा कचरा गोळा केला.एकीकडे शासनाने प्लास्टिकबंदी लावली आहे, मात्र या बंदीचा फार प्रभाव जनमानासात दिसून येत नाही. आजही सर्रासपणे प्लास्टिकचा उपयोग केला जातो आणि कुठेही फेकले जाते. सौंदर्ययुक्त परिसराचीही पर्वा केली जात नाही. अंबाझरी उद्यान आणि तलावाचा परिसर पर्यटक आणि प्रेमीयुगुलांसाठीही आवडीचे ठिकाण आहे. मात्र येथे येणाऱ्यांना नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या परिसराच्या स्वच्छतेबाबत कोणतेही सोयरसुतक असल्याचे दिसत नाही. जवळ असलेला कचरा अगदी बेमुर्वतपणे कुठेही फेकायचा या प्रवृत्तीचे ग्रहण या तलावाच्याही सौंदर्याला लागले आहे. ही बाब आय क्लीन टीमच्या लक्षात आली. दर रविवारी न चुकता एखादे स्थान निश्चित करून त्याच्या सौंदर्यासाठी वेळ आणि श्रम देणाºया स्वयंसेवकांनी १४ एप्रिल रोजी अंबाझरी परिसरात अभियान राबविले. २० ते २५ स्वयंसेवक कामाला लागले आणि संपूर्ण परिसरातून प्लास्टिकचा कचरा गोळा केला. २० बॅग भरतील एवढा प्लास्टिकचा कचरा या सदस्यांनी गोळा केला आणि परिसर प्लास्टिकच्या कचऱ्यापासून मुक्त केला. या स्वयंसेवकांना स्वच्छता करताना पाहून फिरायला आलेले नागरिकही या अभियानात सहभागी झाले.वंदना मुजुमदार आणि संदीप अग्रवाल यांच्या नेतृत्वात आय क्लीनची टीम गेल्या तीन वर्षापासून न चुकता दर रविवारी शहराच्या सौंदर्यीकरणासाठी वेळ आणि श्रम देत आहे. एखादी मोठी भिंत असलेले ठिकाण निवडायचे. रविवारी सकाळी तेथे गोळा व्हायचे. आधी ते ठिकाण स्वच्छ करायचे आणि मग दुरवस्था झालेली भिंत रंगवायची. त्यावर वार्ली चित्रकारिता साकारायची. अशाप्रकारे या टीमने एक-दोन नव्हे तर तब्बल १५८ ठिकाण रंगविले व त्या स्थानाचे सौंदर्य खुलविले आहे. यासाठी लागणारा आर्थिक निधी जमविण्यापासून कुणी सहकार्य करो अथवा करू नये, आपले काम करीत जायचे. आय क्लीनच्या टीममध्ये ज्येष्ठही आहेत आणि तरुणही. विशेषत: दर अभियानात तरुण या कार्याशी जुळत असून, हेच या टीमचे यश आहे.

टॅग्स :Ambazari Lakeअंबाझरी तलावPlastic banप्लॅस्टिक बंदी